‘जिओ’ने जोडले 4.24 कोटी ग्राहक
अंबानींच्या जिओचा डंका सुरुच : आर्थिक वर्ष 2023-24 मधील आकडेवारीचा समावेश
वृत्तसंस्था /मुंबई
भारतातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी, रिलायन्स जिओने ग्राहकांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. कंपनीच्या वार्षिक अहवालानुसार, गेल्या वर्षी म्हणजे 2023-24 मध्ये जिओने 4.24 कोटी नवीन ग्राहक जोडले. आता कंपनीचे एकूण 48.18 कोटी ग्राहक आहेत. अहवालात असेही समोर आले आहे की जिओचे 10.8 कोटी पेक्षा जास्त ग्राहक 5 जी नेटवर्क वापरत आहेत, ज्याला जिओ ट्यू 5 जी म्हणतात. जिओकडे देशात 5 जी नेटवर्कची क्षमता 85 टक्के आहे. तसेच, भारतातील एकूण डेटा वापरापैकी 60 टक्के जिओचा वाटा आहे.
जिओ देशभरात 5 जी नेटवर्क आणणार
रिलायन्स जिओने सांगितले की त्यांनी देशभरात 5 जी नेटवर्क खूप लवकर आणण्याच्या तयारीत आहे. आता जिओच्या एकूण डेटापैकी 30 टक्के डेटा 5 जी नेटवर्कवर चालतो. आणि हा 5जी डेटा आहे, तो जिओच्या 5 जी आणि 4 जी नेटवर्कच्या संयोगाने चालू करण्यात येणार असल्याची माहिती आहे. रिलायन्सने पुढे सांगितले की, जिओची वेगवान इंटरनेट सेवा, जिओ एअर फायबर लोकांच्या पसंतीस पडली आहे. आतापर्यंत त्याचे 1 कोटी 20 लाख ग्राहक आहेत. ही सेवा सध्या 5900 शहरांमध्ये उपलब्ध असून लवकरच ती संपूर्ण देशात उपलब्ध होणार आहे. जिओचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन, जिओभारत फोननेही बाजारात धुमाकूळ घातला आहे.