अडथळ्यावर मात करत जिनेन्द्र सांगावे नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये द्वितीय
इचलकरंजी प्रतिनिधी
स्पर्धेपूर्वी दोनच दिवसात त्याची गाडी दुरुस्त झाली. परंतु जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्याने कोणत्याही स्थितीत स्पर्धेत सहभाग घ्यायचाच असा निस्चय केला. आहे त्याच ठिकाणी सेकंड हॅन्ड गाडी घेतली, परंतु त्यातही अनेक दोष होते. सर्व अडथळ्यावर मात करीत अ.लाट (तालुका शिरोळ) येथील जिनेन्द्र सांगावे यांनी एम आर एफ नॅशनल सुपरक्रॉस चॅम्पियनशिप 2023 या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवून लक्ष वेधले.
जिनेन्द्र सांगावे वय वर्षे 14 यांनी एम आर एफ नॅशनल सुपरक्रॉस चॅम्पियनशिप 2023 या स्पर्धेमध्ये 450cc 'ग्रुप ए' वय 16 वर्षे वयोगटातील स्पर्धेत भाग घेतला होता. स्पर्धेच्या दोन दिवस पूर्वी याची रेसिंग बाईक एका मोठ्या स्पर्धेमध्ये एक्सीडेंट झाल्याने संपूर्ण उद्ध्वस्त झाली. दोनच दिवसात नॅशनल चॅम्पियनशिप चे रेस असल्याने तिथेच एक सेकंड हॅन्ड गाडी खरेदी करून स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला परंतु सेकंड हॅन्ड गाडी खराब लागल्याने कोयंबतूर - गोवा - बडोदा - बेंगलोर - मेंगलोर - मैसूर या सहा शहरांमध्ये झालेल्या स्पर्धेत प्रत्येक स्पर्धेमध्ये काही ना काही तांत्रिक बिघाड झाल्याने सर्व ठिकाणी दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. इंजिन स्टॉपिंग इशू, ब्रेक फेल इशू, थ्रोटल इशू, सस्पेन्शन इशू , अशा सर्वच गोष्टींवर मात करीत स्पर्धेमध्ये स्वतःला सिद्ध करीत संपूर्ण नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचा अभिमानास्पद मानकरी ठरला.
जिनेन्द्र हा याच स्पर्धेमधील ओपन 500cc मोठ्या गटात 2022 सालचा ऐतिहासिक चॅम्पियन आहे. एप्रिल 2023 मध्ये मोटोक्रॉस स्पर्धेची सुरुवात झाली होती .कोयंबतूर गोवा बडोदा या स्पर्धेनंतर जुन मध्ये जिनेन्द्रने चेन्नई येथे सर्किट रोड रेसिंग मध्ये देखील सहभाग नोंदवला होता. परंतु या स्पर्धेमध्ये जिनेन्द्र च्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने पाच महिने सराव न करता विश्रांती घ्यावी लागली. नोव्हेंबर मध्ये पुन्हा मोटोक्रॉस च्या उर्वरित तीन स्पर्धांना सुरुवात झाली.डॉक्टरांनी ऑपरेशन नंतर दहा महिने विश्रांती सांगून देखील पुन्हा पाचव्या महिन्यातच स्पर्धेला सुरुवात केली.एका खेडेगावातील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील जिनेन्द्रच्या जिद्दीला नावाजण्यासारखे आहे.
या खेळासाठी त्याचे काका सागर सांगावे हे मार्गदर्शन करीत असून ऍक्सर आणि वेगा हेल्मेट कंपनी बेळगावी, मोहिते रेसिंग अकॅडमी कोल्हापूर, आवाडे मोटर स्पोर्ट्स,टी टू रेसिंग व्हिलेज बरोडा यांचे सहकार्य मिळत आहे.