For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिंदाल स्टीलने 1.25 कोटी टन उत्पादनाचे ठेवले उद्दिष्ट

06:37 AM Aug 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
जिंदाल स्टीलने 1 25 कोटी टन उत्पादनाचे ठेवले उद्दिष्ट
Advertisement

निर्यात वाढवण्याची जय्यत तयारी :

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

भारतातील पोलाद उत्पादनात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या जिंदाल स्टील लिमिटेडने आपल्या पोलाद उत्पादनाचे उद्दिष्ट 1.25 कोटी टनवर नेण्याचे ठरवले आहे. हे उद्दिष्ट कंपनीला 2028 पर्यंत साध्य करायचे आहे. जिंदाल स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक विद्या रतन शर्मा यांनी ही माहिती दिली आहे. कंपनी आगामी काळात निर्यातीवर अधिक भर देणार आहे. पश्चिम आशियात निर्बंधामुळे भारतातील पोलादाच्या निर्यातीत अडचणी येत आहेत. त्यावर मात करण्याचा प्रयत्न होतो आहे.

Advertisement

सध्याला पाहता कंपनी 90 लाख टन ततक्या पोलादाचे उत्पादन घेते, जे वाढवत 2028 पर्यंत 1.25 ते 1.50 लाख टन इतके करायचे आहे. हे करतानाच कंपनीकडून नफा वाढवण्याचेही नियोजन केले जात आहे. एवढ्यावरच न थांबता निर्यातीत वाढ करण्याबाबतही नियोजन करण्यात येत आहे. याचप्रमाणे कंपनीतील मनुष्यबळ अधिक सक्षम करण्याचाही इरादा कंपनीचा आहे.

निर्यात करणार भक्कम

पोलाद निर्यातीचा विचार करता ब्रिटन, ओमान व युएई येथील बाजारांमध्ये पोलादाची निर्यात कंपनीला वाढवायची आहे. युरोप ही सुद्धा मोठी बाजारपेठ असली तरी सध्याला पश्चिम आशियाई संकटाने निर्यातीत अडथळे आणले आहेत. युद्ध संपल्यानंतर युद्धग्रस्त देशांमध्ये पोलादाची मागणी वाढली आहे.

Advertisement
Tags :

.