For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विविध ठिकाणी जिजाऊ-स्वामी विवेकानंद जयंती साजरी

10:02 AM Jan 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
विविध ठिकाणी जिजाऊ स्वामी विवेकानंद जयंती साजरी
Advertisement

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisement

महिला आघाडीच्यावतीने

महाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडीच्यावतीने शुक्रवारी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. राजमाता जिजाऊ हे एक लढाऊ व्यक्तिमत्त्व असून त्यांच्या प्रेरणेने आजही समाजातील अनेक महिला उत्तम कार्य करत असल्याचे मत महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर यांनी व्यक्त केले. सेक्रेटरी सरिता पाटील यांनी स्वामी विवेकानंद यांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी कांचन भातकांडे, मधुश्री कोलेकर, श्रद्धा मंडोळकर, अनुपमा कोकणे, माला जाधव, राजश्री बडमंजी, प्रिया कुडची यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Advertisement

भारतीय महिला फेडरेशन

भारतीय महिला फेडरेशन, बेळगाव यांच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. रामदेव गल्ली येथील भगतसिंग सभागृहात हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी बेळगाव शाखेच्या कॉ. कला सातेरी होत्या. यावेळी कॉ. मीरा मादार यांनी सावित्रीबाई फुलेंच्या कार्याचा आढावा घेतला. या प्रसंगी कला कार्लेकर, शोभा होसमनी, उमा माने, कॉ. जुलेखा यासह महिला उपस्थित होत्या.

बार असोसिएशन

आध्यात्म आणि धार्मिकतेमुळेच स्वामी विवेकानंद इतके मोठे झाले. प्रत्येकाने स्वार्थ बाजूला ठेऊन आनंदात राहिले पाहिजेत. आध्यात्मामुळे बुद्धी तल्लीन होते. वेद काय आहेत हेदेखील समजून घेतल्यास निश्चितच मनुष्य यशस्वी होऊन उंच शिखर गाठेल. त्यासाठी आध्यात्मावर भर द्यावा, असे आवाहन रामकृष्ण मिशन आश्रमचे स्वामी मोक्षात्मानंदजी महाराज यांनी केले. बेळगाव बार असोसिएशन आणि आधिवक्ता परिषद यांच्यावतीने स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते  बोलत होते.  मुख्य जिल्हासत्र न्यायालयाच्या न्यायाधीश विजयालक्ष्मी देवी उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी बार असोसिएशनचे प्रभारी अध्यक्ष अॅड. सुधीर चव्हाण होते. प्रारंभी बार असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी अॅड. गिरीराज पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर स्वामी मोक्षात्मानंदजी महाराज यांनी स्वामी विवेकानंदांच्या कार्याबद्दल माहिती दिली. उपाध्यक्ष अॅड. सचिन शिवण्णावर यांच्यासह इतर वकील उपस्थित होते.

स्वामी विवेकानंद असोसिएशन

स्वामी विवेकानंद असोसिएशन आणि सिध्दी विनायक विश्वस्त मंडळ यांच्या संयुक्तविद्यमाने स्वामी विवेकानंद जयंती आणि राजमाता जिजाऊ जंयती साजरी करण्यात आली. स्वामी विवेकानंद कॉलनीमध्ये हा कार्यक्रम झाला. अध्यक्ष बाळकृष्ण गोडसे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. सविता कटगेरी यांच्या हस्ते जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी दोन्ही मंडळांचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

मराठा मंदिर

सालाबादप्रमाणे यंदाही मराठा मंदिर येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव यांच्या हस्ते जिजाऊ तर उपाध्यक्ष नेमिनाथ कंग्राळकर यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नागेश तरळे यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नेताजी जाधव यांनी स्वागत केले. याप्रसंगी लक्ष्मण होनगेकर, लक्ष्मण सैनुचे, चंद्रकांत गुंडकल, शिवाजी हंगिरकर, विश्वास घोरपडे, बाळाराम पाटील, दशरथ डोंबले, अनिल जांबोटकर, दिनकर घोरपडे आदी उपस्थित होते.

मराठा मंडळाच्या इन्स्टिट्यूट ऑफ डेन्टल सायन्स

मराठा मंडळ संचलित नाथाजीराव हलगेकर इन्स्टिट्यूट ऑफ डेन्टल सायन्स आणि रिसर्च सेंटरतर्फे शुक्रवारी राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला. यावेळी श्री वज्रराजा गोविंदा दास स्वामीजी यांच्या भगवतगीतेचे सर्वांगिण फायदे या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. सहाना कट्टी यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. रमाकांत नायक, डॉ. प्रिती कुसुगल, डॉ. विरेंद्र उप्पीन, डॉ. विप्लवी चव्हाण-पाटील यासह वायआरसीचे सदस्य उपस्थित होते. डॉ. सई चांदनी यांनी आभार मानले.

Advertisement
Tags :

.