For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ओटवणे येथील जिजाबाई गावकर यांचे निधन

03:04 PM Jun 19, 2026 IST | अनुजा कुडतरकर
ओटवणे येथील जिजाबाई गावकर यांचे निधन
Advertisement

ओटवणे : प्रतिनिधी
ओटवणे गावठणवाडी येथील रहिवासी जिजाबाई तुकाराम गावकर (८०) यांचे गुरुवारी मध्यरात्रीनंतर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात निधन झाले. गेले दोन दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव शुक्रवारी सकाळी घरी आणल्यानंतर ओटवणे वासियांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत गावकर कुटुंबीयांचे सांत्वन केले. सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबईस्थित बाळकृष्ण उर्फ दादा गावकर आणि सावंतवाडी वन खात्याचे कर्मचारी ज्ञानेश्वर गावकर यांच्या त्या मातोश्री होत. तसेच नोकरी निमित्त वास्को येथे राहणारे गोपीनाथ गावकर यांची ती भावजय तर वास्कोस्थित रामा व महेश गावकर यांच्या त्या काकी होत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, सुन, दिर, जाऊ, पुतणे, नातवंडे, जावई असा परिवार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.