महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

झारखंड सरकार धोक्यात ? आमदारांना तेलंगणात हलवण्याच्या हालचालींना वेग

10:07 AM Feb 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था /रांची

Advertisement

झारखंड सरकार धोक्यात? सत्ताधारी जेएमएम-काँग्रेस आमदारांना तेलंगणात हलवण्याच्या हालचालींना वेग, भाजपा सध्या झारखंडमधील राजकारण चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. झारखंडमधील राजकारणात सध्या मोठ्या वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना बुधवारी रात्री अटक केल्यानंतर आज (1 फेब्रुवारी) काही वेळापूर्वी सक्तवसुली संचालनालयाच्या न्यायालयात हजर करण्यात आले.  तर हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यादेखील ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्या आहेत. झारखंड मुक्ती मोर्चाने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेले असून शुक्रवारी सुनावणी होणार आहे. दरम्यान, झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे सभागृह नेते चंपई सोरेन आता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. चंपई सोरेन यांनी सत्तास्थापनेचा दावा केला आहे. परंतु, राज्यपालांनी अद्याप चंपई यांना शपथग्रहण करण्यासाठी आमंत्रित केलेले नाही.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article