For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माविनकट्टी महालक्ष्मी मंदिरात तीन लाखांच्या दागिन्यांची चोरी

06:50 AM Sep 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
माविनकट्टी महालक्ष्मी मंदिरात तीन लाखांच्या दागिन्यांची चोरी
Advertisement

देवीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास : चोरट्यांकडून मंदिरे लक्ष्य

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

चोऱ्या, घरफोड्यांपाठोपाठ तालुक्यातील मंदिरांनाही चोरट्यांनी लक्ष्य बनविले आहे. माविनकट्टी येथील श्री महालक्ष्मी देवी मंदिरात चोरी झाली आहे. दरवाजाला घातलेला कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी सुमारे 3 लाख रुपयांहून अधिक किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने पळविले आहेत.

Advertisement

उळवाप्पा शिवराय मल्लन्नावर या देवस्थान कमिटीच्या अध्यक्षांनी मारिहाळ पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. रविवारी 30 ऑगस्ट रोजी रात्री 10 ते सोमवारी 31 ऑगस्टच्या सकाळी 6 या वेळेत चोरीची घटना घडली आहे. मंदिराचे प्रवेशद्वार व गाभाऱ्याच्या दरवाजाला घातलेले कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला आहे.

देवीच्या अंगावरील 10 ग्रॅम सोन्याचे दागिने, 1 किलो 181 ग्रॅम चांदीचे दागिने चोरण्यात आले आहेत. सोन्याचे मंगळसूत्र, कर्णफुले, चांदीचे छत्र, चांदीचे तोडे, पैंजण, जोडवी, चांदीचा गणपती, चांदीची लिंगदळी, चांदीच्या मासोळ्या चोरट्यांनी पळविल्या आहेत. घटनेची माहिती समजताच मारिहाळ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

बेळगाव शहर व तालुक्यात चोऱ्या, घरफोड्यांबरोबरच मंदिरांनाही लक्ष्य बनविण्यात येत आहे. जुन्या प्रकरणांचा छडा लागला नाही तोच नव्याने चोरीचे प्रकार घडू लागले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून चोरट्यांचा माग काढण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे. श्रावण मासामध्ये भाविक देवदेवतांची भक्ती व आराधना करतात. या पवित्र मासामध्ये झालेल्या चोरी प्रकरणाने खळबळ माजली आहे.

Advertisement
Tags :

.