दहा लाखाचे दागिने बंगल्यातून चोरीला
सांगली :
शहरातील जामवाडी येथील भर चौकात असणाऱ्या बंगल्यामधून दहा लाख रूपये किंमतीचा सोन्याचा गोफ चोरीला गेला आहे. ही चोरी 1 नोव्हेंबर 2024 ते दि. 15 जानेवारी 2025 या कालावधीत घडली. याबाबत अनिरुध्द चंद्रकांत सूर्यवंशी (रा. पटेल चौक, जामवाडी, सांगली) यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द फिर्याद दिली आहे.
या चोरीबाबत अधिक माहिती अशी, पटेल चौकापासून नजीक असणाऱ्या जामवाडी परिसरात फिर्यादी अनिरुध्द सूर्यवंशी राहतात. घरामध्येच राहणाऱ्या त्यांच्या वहिनी प्रतिक्षा सूर्यवंशी यांच्या बेडऊममध्ये असलेल्या तिजोरीत हे सोन्याचे दागिने ठेवले होते. त्यामध्ये सोन्याचा गोफ तसेच सोन्याच्या बांगड्या आणि चेन असे दागिने ठेवण्यात आले होते. त्याची किंमत जवळपास 10 लाख रूपये आहेत. अनिरूध्द यांनी गोफची मागणी केली असता तो सापडला नाही. त्यावेळी त्याची शोधाशोध केली असता ते कोठेही मिळाले नाही. त्यानंतर या सर्व दागिन्याची माहिती घेण्यास सुरूवात केली असता ते सर्व दागिने चोरीला गेल्याचे बुधवार ा†द. 15 जानेवारी रोजी त्यांच्या लक्षात आले.
यामध्ये सोन्याचा गोफ, सोन्याच्या बांगड्या, सोन्याची चेन असा जवळपास शंभर ग्रॅमच्या दा†गन्यांचा समावेश आहे. चोरीची मा†हती ा†मळताच ा†फर्यादी आ†नऊध्द सूर्यवंशी यांनी सांगली शहर पोलिसात धाव घेत याबाबत मा†हती ा†दली. पा†लसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून चोरट्या†वरोधात गुन्हा दाखल केला आहे.