कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भाग्यनगरात घरातील दागिने टप्प्याटप्प्याने चोरले

01:03 PM Nov 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

6 लाखांचा ऐवज : चोरीच्या प्रकाराने आश्चर्य 

Advertisement

बेळगाव : भाग्यनगर, पहिला क्रॉस येथील एका घरातून सुमारे 6 लाख 14 हजार रुपये किमतीच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. यासंबंधी शुक्रवारी टिळकवाडी पोलीस स्थानकात फिर्याद देण्यात आली असून पोलीस निरीक्षक परशुराम पुजेरी पुढील तपास करीत आहेत. घरातील मंडळी घरात असतानाच ही चोरी झाली आहे. उपलब्ध माहितीनुसार दि. 25 ऑक्टोबर 2025 पासून 6 नोव्हेंबर 2025 च्या सायंकाळी 7 यावेळेत ही चोरी झाली आहे. चोरट्यांनी मंगळसूत्र, नेकलेस, ब्रेसलेट असे एकूण 61.02 ग्रॅम सोन्याचे दागिने टप्प्याटप्प्याने पळविले आहेत. त्याची एकूण किंमत 6 लाख 14 हजार रुपये इतकी होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे घरातील मंडळी घरात असतानाच ही घटना घडली आहे.

Advertisement

त्यामुळे चोरी करणारे कोण? याचा शोध घेण्याचे आव्हान पोलीस दलासमोर आहे. घरातील मंडळींच्या नकळत टप्प्याटप्प्याने तिजोरीतील दागिने पळविण्यात आले आहेत. बेडरूममधील तिजोरीच्या लॉकरमधून दागिन्यांची चोरी झाली आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे. अशा प्रकरणात जवळच्याच व्यक्तींचा सहभाग असतो, ही गोष्ट लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे. बेळगाव शहर व उपनगरात एपीएमसी, माळमारुती पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रातही अशा घटना घडल्या आहेत. घरातील मंडळींच्या नकळत दागिने व रोकड लांबविण्यामागे कामगार किंवा जवळच्यांचाच सहभाग असतो. ही शक्यता लक्षात घेऊन तपास करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article