'मांडवी' मधून लाखाचे दागिने चोरीस
चिपळूण :
मांडवी एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या महिलेचे 1 लाख 950 रुपये किंमतीचे दागिने चोरीस गेले आहेत. ही घटना 19 मे रोजी सायंकाळी 4.45 वाजता वालोपे रेल्वेस्थानकात घडली. याप्रकरणी अज्ञातावर बुधवारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित महिला 19 रोजी फलाट क्रमांक 1 वर आलेल्या मांडवी एक्स्प्रेसमध्ये चढली. त्यानंतर सीटवर बसल्यानंतर हातातील बॅगेत असलेल्या लहान पाकिटातील 45 ग्रॅम वजनाचे 1 लाख 950 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, 3 हजार 500 रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे तिच्या लक्षात आले. त्यामुळे या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. गर्दीचा उठवला फायदा घेऊन चोरटे महिलांचे दागिने चोरत आहेत. त्यामुळे रेल्वेत चढताना व उतरताना गर्दी न करता दक्ष राहून प्रवास करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
.