For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दागिन्यांची निर्यात 28 हजार कोटी पार

06:21 AM Oct 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
दागिन्यांची निर्यात 28 हजार कोटी पार
Advertisement

सप्टेंबरमधील आकडेवारी जाहीर :  11 हजार कोटींची सोन्याच्या दागिन्यांची निर्यात

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

उत्सवी काळाच्या आधी भारताचा रत्न आणि दागिन्यांचा व्यवसाय तेजीत असताना दिसला. सप्टेंबरमध्ये देशामधून रत्न आणि दागिन्यांची एकूण निर्यात 9.43 टक्के वाढत 28157 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. याच दरम्यान आयात 25 टक्के वाढत 19821 कोटी रुपयांची झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Advertisement

सोन्याच्या दागिन्यांचा वाटा अधिक

रत्न आणि दागिने निर्यात संवर्धन परिषद यांच्या माहितीनुसार सप्टेंबर 2026 मध्ये रत्न आणि दागिने यांच्या निर्यातीमध्ये सोन्याच्या दागिन्यांचा वाटा सर्वाधिक राहिला आहे. खास करून किमती खड्यांनी बनवलेले सोन्याचे दागिने विदेशामध्ये सर्वाधिक मागणीत होते. सप्टेंबरमध्ये अशा दागिन्यांची निर्यात 50 टक्क्dयांपेक्षा जास्त होती. सोन्याच्या सर्व प्रकारच्या दागिन्यांची एकूण निर्यात 34 टक्के वाढलेली होती. भारताची जागतिक रत्न आणि दागिने निर्यातीतील हिस्सेदारी जवळपास 3.2 टक्के इतकी आहे.  या क्षेत्रामध्ये भारत जगामध्ये आठव्या नंबरचा निर्यातक देश आहे.

चांदीच्या दागिन्यांची निर्यात

याच सोबत चांदीची निर्यात एप्रिल ते सप्टेंबर अवधीत वाढीव राहिली होती. 6908 कोटी रुपयांच्या चांदीच्या दागिन्यांची निर्यात एप्रिल ते सप्टेंबर या अवधीत केली गेली आहे. मागच्या वर्षी याच अवधीत 5142 कोटी रुपयांची दागिन्यांची निर्यात करण्यात आली होती. सप्टेंबरमध्ये पाहता चांदीच्या दागिन्यांच्या निर्यातीत घसरणच दिसली होती. सप्टेंबरमध्ये चांदीच्या दागिन्यांची निर्यात 1285 कोटी रुपयांची झाली होती. जी मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये 1356 कोटी रुपयांची झाली होती.

Advertisement
Tags :

.