For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिंदोळीत बंद घर फोडून 18 तोळ्याचे दागिने लंपास

11:08 AM Mar 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
शिंदोळीत बंद घर फोडून 18 तोळ्याचे दागिने लंपास
Advertisement

चोरीच्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण

Advertisement

बेळगाव : गंगाधरनगर, शिंदोळी येथील बंद घर फोडून चोरट्यांनी 18 तोळ्याचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना सोमवारी दुपारी 4 ते रात्री 8 या वेळेत घडली आहे. या घटनेमुळे शिंदोळी परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून घटनेची नोंद मारीहाळ पोलीस स्थानकात झाली आहे. गंगाधरनगर येथे गंगव्वा निलाप्पगोळ यांचे घर आहे. घरातील सर्वजण नातेवाईकांच्या कार्यक्रमानिमित्त घर बंद करुन गेले होते. यावेळी चोरट्यांनी घराच्या पाठीमागील दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. बेडरुममधील कपाटात सोन्याचे दागिने होते. ते चोरट्यांनी चोरुन नेले आहेत. रात्री त्यांचे कुटुंबीय घरी परतल्यानंतर ही घटना त्यांच्या निदर्शनास आली. घरी चोरी झाल्याचे लक्षात येताच सोमवारी रात्री उशिरा ही माहिती मारीहाळ पोलिसांना देण्यात आली. या चोरीची माहिती मिळताच मारीहाळचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ठसेतज्ञांनीही पाचारण करण्यात आले. त्यानंतर या घटनेचा पंचनामा केला आहे. चोरट्यांनी 18 तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.