For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जेनिफर विंगेट करणार दुसरा विवाह

06:50 AM Jun 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
जेनिफर विंगेट करणार दुसरा विवाह
Advertisement

घटस्फोटाच्या 11 वर्षांनी होणार वधू

Advertisement

जेनिफर विंगेट स्वत:च्या घटस्फोटाच्या सुमारे 11 वर्षांनी पुन्हा विवाहावरून चर्चत आली आहे.  जेनिफर स्वत:च्या आयुष्यातील नवा टप्पा सुरू करण्यास तयार आहे. जेनिफर ही इस्माइल विलियमसोबत विवाहबद्ध होणार आहे. विलियमने जेनिफरला विवाहासाठी विचारणा केली होती, ज्याला जेनिफरने होकार दिला आहे. आता दोघेही विवाहासाठी नियोजन करत आहेत.

जेनिफर अन् इस्माइल दोघेही ख्रिश्चन पद्धतीने विवाहबद्ध होणार असून हा सोहळा सप्टेंबर-ऑक्टोबर किंवा डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. सध्या दोघेही विवाहासाठी योग्य ठिकाण निवडत आहेत. इस्माइल हा सिंगापूर येथील उद्योजक आहे. इस्माइलसोबत जेनिफर मागील काही काळापासून डेटिंग करत आहे. दोघेही परस्परांना अत्यंत पसंत करतात असे सांगण्यात येत आहे.

Advertisement

जेनिफर यापूर्वी अभिनेता करण सिंह ग्रोवरची पत्नी होती आणि 2012 मध्ये विवाहबद्ध या जोडप्याने 2015 साली घटस्फोट घेतला होता. तर घटस्फोटानंतर करण सिंह ग्रोवरने अभिनेत्री बिपाशा बासूसोबत विवाह केला होता

Advertisement

.