जेनकिन्स यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
राष्ट्रकुल क्रीडा संघटनेचे अध्यक्ष ख्रिस जेनकिन्स यांनी मंगळवारी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. जेनकिन्स यांनी गेली काही वर्षे हे अध्यक्षपद भूषविले होते. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा दर्जा सुधारण्यासाठी जेनकिन्स यांचे योगदान महत्त्वाचे आहे.
राष्ट्रकुल फेडरेशनची येत्या नोव्हेंबरमध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. तोपर्यंत डोनाल्ड रुकेरी यांच्याकडे हंगामी अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रकुल क्रीडा फेडरेशनचे कार्यकारी अधिकारी केटी सॅडलेर यांनी केली आहे. जेनकिन्स यांनी आपल्या अध्यक्षपदाचा लेखी राजीनामा संघटनेकडे पाठविला असून त्यामध्ये अध्यक्षपद सोडण्याचे निश्चित कारणाचा खुलासा करण्यात आलेला नाही. 2026 ची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ग्लॅस्गो येथे होणार आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये राष्ट्रकुल क्रीडा फेडरेशनच्या नव्या अध्यक्षाची निवड केली जाईल.