For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्रीमंतांमध्ये जेफ बेझोस जगात अव्वल

06:56 AM Mar 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
श्रीमंतांमध्ये जेफ बेझोस जगात अव्वल
Advertisement

एलॉन मस्क यांना टाकले मागे : बेझोस यांची  संपत्ती 200 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढली

Advertisement

नवी दिल्ली : 

जगविख्यात उद्योजक एलॉन मस्क यांना मागे टाकत जेफ बेझोस जगातले अव्वल श्रीमंत व्यक्ति ठरले आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बेझोस यांची संपत्ती 200 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढली असून, मुकेश अंबानी 11 व्या क्रमांकावर राहिले आहेत्Aा. एलॉन मस्क आता जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती राहिलेले नाहीत. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीनुसार, अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी त्यांना मागे टाकले आहे आणि ते पहिल्या स्थानावर पोहोचले आहेत.

Advertisement

टेस्ला शेअर्सच्या घसरणीमुळे मस्क यांची एकूण संपत्ती कमी झाली आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीनुसार, जेफ बेझोसची एकूण संपत्ती आता 200 अब्ज डॉलर (सुमारे 16.58 लाख कोटी रुपये) आहे, तर एलॉन मस्कची एकूण संपत्ती  198 अब्ज डॉलर (सुमारे 16.41 लाख कोटी रुपये) आहे. लुई व्हिटॉन मोएट हेनेसीचे सीईओ बर्नार्ड अरनॉल्ट 197 अब्ज डॉलर ( 16.33 लाख कोटी) संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर आहेत.

देशातील एकही अब्जाधीश पहिल्या दहात नाही

महत्त्वाचे म्हणजे या जागतिक श्रीमंतांच्या यादीत पहिल्या दहामध्ये भारतातील एकाही अब्जाधीशाचा समावेश नाही. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी 115 अब्ज डॉलर्स (सुमारे 9.53 लाख कोटी रुपये) संपत्तीसह 11व्या स्थानावर आहेत. तर गौतम अदानी या यादीत 12 व्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 104 अब्ज डॉलरची (8.62 लाख कोटी रुपये) आहे.

टेस्लाचे समभाग 24 टक्केपेक्षाजास्त घसरले

एलॉन मस्कची कंपनी टेस्लाच्या स्टॉकमध्ये या वर्षी आतापर्यंत 24 टक्केपेक्षा जास्त घसरण झाली आहे. 1 जानेवारी रोजी ते 248.42 डॉलरवर होते, जे आता 188.14 डॉलर (मार्च 5) पर्यंत खाली आले आहे. शेअर्सच्या किमती घसरल्याने मस्कची संपत्ती घसरली आहे. त्याचवेळी, अॅमेझॉनच्या शेअर्समध्ये यावर्षी आतापर्यंत 18 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Advertisement
Tags :

.