For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गया मतदारसंघातून निवडणूक लढविणार जीतराम मांझी

07:00 AM Mar 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
गया मतदारसंघातून निवडणूक लढविणार जीतराम मांझी
Advertisement

पाटणा : बिहारमध्ये रालोआदरम्यान जागावाटप ठरल्यावर आता विविध पक्षांकडून उमेदवारांची नावे घोषित होऊ लागली आहेत. याचनुसार रालोआतील घटक पक्ष हिंदुस्थान अवाम मोर्चाला एक जागा मिळाली आहे. ‘हम’च्या वाट्याला गया लोकसभा मतदारसंघ आला असून तेथील उमेदवारही जाहीर करण्यात आला आहे. गया मतदारसंघात रालोआच्या वतीने हमचे अध्यक्ष जीतनराम मांझी हे निवडणूक लढविणार आहेत. गया लोकसभा मतदारसंघात आम्ही रालोआच्या अजेंड्यासोबत जनतेदरम्यान जाणार आहोत. जीतनराम मांझी यांना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाने सर्वसंमतीने घेतला आहे. रालोआत गया लोकसभा मतदारसंघ आमच्याकरता सोडण्यात आल्याने आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो असे उद्गार हमचे अध्यक्ष आणि मांझी यांचे पुत्र संतोष सुमन यांनी काढले आहेत. जीतनराम मांझी हे 28 मार्च रोजी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यांच्यासमोर राजद उमेदवाराचे आव्हान असणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.