For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धाराशिवमध्ये जेसीबीला भीषण आग; चालकाने प्रसंगावधान राखत उडी घेत वाचवला जीव

08:57 AM Sep 08, 2026 IST | YOGESH KANGUDE
धाराशिवमध्ये जेसीबीला भीषण आग  चालकाने प्रसंगावधान राखत उडी घेत वाचवला जीव
Advertisement

धाराशिव : लोहारा शहरात जेसीबीला अचानक भीषण आग लागल्याची थरारक घटना घडली. आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने क्षणाचाही विलंब न करता जेसीबीमधून उडी घेतल्याने त्याचा जीव थोडक्यात बचावला.

Advertisement

आगीने काही क्षणांतच जेसीबीच्या वरच्या भागासह स्टेअरिंग आणि केबिनचा भाग अक्षरशः जळून खाक झाला. आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लोट पसरले. त्यामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र जेसीबीचे मोठे नुकसान झाले आहे.

Advertisement

दरम्यान, जेसीबीला आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Advertisement
Tags :

.