For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जयवंत हम्मण्णावर यांची पीसीआय जनरल सेक्रेटरीपदी निवड

09:51 AM Mar 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
जयवंत हम्मण्णावर यांची पीसीआय जनरल सेक्रेटरीपदी निवड
Advertisement

बेळगाव : दिल्ली येने नुकत्याच झालेल्या पीसीआय निवडणुकीत ऑलिम्पिक कमिटी ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी देवेंद्र झाझरिया तर बेळगावच्या हम्मण्णावर यांची जनरल सेक्रेटरीपदी निवड झाली आहे. दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या पॅरा ऑलिम्पिक कमिटी ऑफ इंडियाच्या निवडणुकीत माजी पॅरा ऑलिम्पिक देवेंद्र झाझरिया यांची संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. तर बेळगावचे जयवंत हम्मण्णावर यांची जनरल सेक्रेटरीपदावरती निवड झाली आहे. जयवंत हम्मण्णावर हे व्हॉलीबॉल खेळाडू असून राष्ट्रीय बीच  हॉलीबॉलचे राष्ट्रीय पंच आहेत. ते टेबल टेनिस प्रशिक्षक असून गेली दहा वर्ष गोवा राज्याचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन त्यांची या पदावरती निवड झाली आहे. पॅरा ऑलिम्पिक कमिटी ऑफ इंडिया ही संस्था आंतरराष्ट्रीय हॅलो पॅरा ऑलिम्पिक कमिटी, राष्ट्रीय प्यारा ऑलिम्पिक कमिटी, राष्ट्रीय स्पोर्ट्स फेडरेशन गव्हर्मेंट ऑफ इंडिया व फिजिकल चॅलेंज इन इंडिया या संघटनेची संलग्न आहे. जनरल सेक्रेटरीपदी निवड झालेले जयवंत हम्मण्णावर बेळगावचे पहिले व्यक्ती आहेत. या निवडीबद्दल जयवंत हम्मण्णावर यांचे कौतुक होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.