For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

‘स्वबळावर लढलो असतो तर जिल्हा बँक जिंकली असती’; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचा मित्रपक्षांना टोला

08:54 PM Nov 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘स्वबळावर लढलो असतो तर जिल्हा बँक जिंकली असती’  ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचा मित्रपक्षांना टोला
Advertisement
सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीनंतर महायुतीमधील अंतर्गत मतभेद समोर आले आहेत. भाजप नेते तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी निवडणुकीतील मित्रपक्षांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत काही ठिकाणी दगाफटका झाल्याचा आरोप केला.

निवडणुकीच्या निकालानंतर आयोजित पहिल्या पत्रकार परिषदेत गोरे यांनी भाजपने महायुतीचा धर्म प्रामाणिकपणे पाळल्याचे स्पष्ट केले. मात्र, मित्रपक्षांकडून काही ठिकाणी अपेक्षित सहकार्य मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

स्वबळावर लढलो असतो तर विजय मिळविला असता

भाजपने जिल्हा बँकेची निवडणूक स्वबळावर लढविली असती, तर बँकेत विजय मिळविण्यात यश आले असते, असा विश्वास जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला. त्यांच्या या विधानातून महायुतीतील मित्रपक्षांच्या कार्यपद्धतीबाबतची नाराजी स्पष्ट झाली.

Advertisement

जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर भाजपच्या या भूमिकेमुळे सातारा जिल्ह्यातील महायुतीच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. आगामी काळात मित्रपक्षांमधील समन्वय आणि या नाराजीचे राजकीय पडसाद कसे उमटतात, याकडे लक्ष लागले आहे.

Advertisement
Tags :

.