For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लंकन संघाच्या हंगामी प्रशिक्षकपदी जयसुर्या

06:33 AM Jul 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
लंकन संघाच्या हंगामी प्रशिक्षकपदी जयसुर्या
Advertisement

वृत्तसंस्था/कोलंबो

Advertisement

पुढील महिन्यात श्रीलंकेत होणाऱ्या भारता विरुध्दच्या वनडे मालिकेसाठी लंकन क्रिकेट मंडळाने माजी कर्णधार सनथ जयसुर्याची लंकन संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी हंगामी निवड केली आहे.

भारतीय क्रिकेट संघ लंकेच्या दौऱ्यात तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. 27 जुलैपासून या मालिकेला प्रारंभ होईल. गेल्या आठवड्यात लंकेचे प्रमुख प्रशिक्षक इंग्लंडचे ख्रिस सिलव्हरवूड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. भारताबरोबरच्या मालिकेसाठी लंकन क्रिकेट मंडळाने सनथ जयसुर्याची हंगामी प्रमुख प्रशिक्षक म्हणून तातडीने निवड केली आहे. 1991 ते 2007 या कालावधीत सनथ जयसुर्याने 110 कसोटीत 14 शतके आणि 31 अर्ध शतकांसह 6973 धावा त्याचप्रमाणे 445 वनडे सामन्यात त्याने 28 शतके आणि 68 अर्धशतकांसह 13430 धावा जमविल्या आहेत. 1996 साली आयसीसीची विश्वकरंडक स्पर्धा जिंकणाऱ्या लंकन संघामध्ये जयसुर्याचा समावेश होता.

Advertisement

Advertisement

.