For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

थोडं थांबा..., अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याबाबत Jayashree Tai Patil काय म्हणाल्या?

04:58 PM Jun 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
थोडं थांबा     अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याबाबत jayashree tai patil काय म्हणाल्या
Advertisement

बैठकीत मदनभाऊंचे सहकारी आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते

Advertisement

सांगली : थोडं थांबा... आताच गडबड करण्याचे कोणतेही कारण नाही. लवकरच निर्णय घेवू, कोणत्याही अफवांवर लक्ष देवू नका. आगामी काळात होणाऱ्या महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आपणास ताकतीने लढायच्या आहेत. त्यामुळे सर्वांनी एकदिलाने काम करूया असे आश्वासन जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती जयश्रीवहिनी पाटील यांनी दिले.

श्रीमती जयश्री मदनभाऊ पाटील यांनी कळंबी येथील फार्म हाऊस येथे मदनभाऊप्रेमी असणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बुधवारी बैठक घेतली. या बैठकीत त्यांच्याबरोबर मदनभाऊंचे सहकारी आजी-माजी नगरसेवक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांच्याशी त्यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला. यावेळी बहुतांश ज्येष्ठ पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते यांनी श्रीमती जयश्रीवहिनींना आश्वस्थ केले.

Advertisement

वहिनी तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल. तसेच अनेक कार्यकर्त्यांनी अत्यंत आक्रमक मनाने मते मांडली. यामध्ये त्यांनी श्रीमती जयश्रीवहिनींच्यावर झालेल्या अन्यायाचा पाढाही वाचला. तसेच यापुढील काळात आपण मदनभाऊप्रेमी म्हणूनच कार्यरत राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जयश्रीवहिनींनी या कार्यकर्त्यांचे मनोगत ऐकून घेतल्यानंतर त्यांना तुमच्या सर्वांचा योग्य सन्मान ठेवला जाईल.

तसेच तुम्हाला यापुढील काळात अनेक चांगल्या गोष्टीवर काम करावे लागेल असे सांगितले. त्यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील प्रमुख समस्या याचा आता सर्वांनी विचार करून या महापालिका क्षेत्राचा दीर्घकालीन विकास आराखडा डोळ्यासमोर ठेवून जनतेचे हित, तसेच कार्यकर्त्यांचे हित बघूनच यापुढील काळात निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले. तुम्ही सर्वांनी निश्चिंत रहा कोणतेही गडबड अथवा अफवांच्यावर विश्वास ठेवू नका.

आपले नाते दृढ करून आपण भविष्याची वाटचाल जोरात करायची आहे असे सांगितले. तसेच येणाऱ्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महानगरपालिका, नगरपालिका निवडणुका या कार्यकर्त्यांच्या ताकतीवर जोरदारपणे लढ्या असे त्यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक उत्तम साखळकर, नगरसेविका रोहिणी पाटील, माजी महापौर कांचन कांबळे यांच्यासह मदनभाऊ युवा मंचचे सर्वच कार्यकर्ते उपस्थित होते.

अजितदादा राष्ट्रवादी पक्षात जाण्याबाबत चर्चा

अनेक कार्यकर्त्यांनी अजितदादा राष्ट्रवादी पक्षात जाण्याचे सुतोवाच या बैठकीत केले. यापुढील काळात तुम्हाला संधी देणाऱ्या पक्षातच तुम्ही काम करा असेही कार्यकर्त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.