For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News | कोल्हापुरातील माजी आमदार जयश्री जाधव यांच्या गाडीचा अपघात; म्हैस गंभीर जखमी, शेतकऱ्याचे मोठे नुकसान

04:42 PM Jul 03, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur news   कोल्हापुरातील माजी आमदार जयश्री जाधव यांच्या गाडीचा अपघात  म्हैस गंभीर जखमी  शेतकऱ्याचे मोठे नुकसान
Advertisement

कोल्हापूर -कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील टोप संभापूर येथे माजी आमदार आणि शिवसेना उपनेत्या जयश्री जाधव यांच्या गाडीचा अपघात झाला. कोल्हापूरहून वडगावच्या दिशेने जात असताना काल सायंकाळी ही घटना घडली.

Advertisement

रस्त्यावर आलेल्या म्हशीला गाडीची जोरदार धडक बसल्याने म्हैस गंभीर जखमी झाली असून अपघातात गाडीचेही मोठे नुकसान झाले आहे. या धडकेत म्हशीचे दोन्ही मागील पाय निकामी झाले असून तिच्या पोटातील सुमारे सहा महिन्यांचे रेडकू दगावल्याची माहिती समोर आली आहे.

अपघातात जखमी झालेली म्हैस टोप संभापूर येथील शेतकरी लक्ष्मण यशवंत कारंडे यांची असून या घटनेमुळे त्यांचे सुमारे दीड लाख रुपयांहून अधिक आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

या अपघातात जयश्री जाधव यांना कोणतीही दुखापत झाली नसल्याची माहिती असून घटनेनंतर परिसरात काही काळ नागरिकांची गर्दी झाली होती. या प्रकरणाची पुढील नोंद आणि तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.

Advertisement
Tags :

.