For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘जय हिंद जय सिंध’मध्ये जयाप्रदा

07:00 AM Jul 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘जय हिंद जय सिंध’मध्ये जयाप्रदा
Advertisement

भारत-पाकिस्तान फाळणीवर सनी देओलचा चित्रपट ‘बंटवारा 1947’ येतोय. याचबरोबर आणखी एक चित्रपट याच विषयावर येणार असून याचे नाव ‘जय हिंद जय सिंध’ असेल. या चित्रपटाचे फर्स्ट लुक पोस्टर जारी करण्यात आले आहे.  हा भारताच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित ऐतिहासिक ड्रामापट असेल. याचे दिग्दर्शन इंद्रजीत लंकेश यांनी केले असून यात फाळणीच्या शोकांतिकेसोबत प्रेमकथेची झालरही आहे. पोस्टरमध्ये 1947 च्या फाळणीची एक झलक आहे. हा चित्रपट ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात विक्रम कोचर, उपासना सिंह, अमित बहल, छाया कदम आणि राहुल देव देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसून येतील. या चित्रपटाची निर्मिती सैमीज एंटरटेनमेंटच्या बॅनर अंतर्गत करण्यात आली आहे. चित्रपटाची कहाणी निर्माते सॅमी ननवानी यांच्या जीवनातील काही वास्तविक अनुभवांनी प्रेरित असल्याचे समजते. चित्रपट मुख्यकरून सिंधच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीवर आधारित असून याच्या माध्यमातून देशभक्ती, प्रेम, स्वत:च्या अस्मितेच्या लढाईला दर्शविण्यात येणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.