जयंत खोब्रागडे भारताचे पोलंडमधील राजदूत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सध्या आसियानमध्ये भारताचे राजदूत म्हणून कार्यरत असलेले भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) अधिकारी जयंत एन. खोब्रागडे यांची पोलंडमधील भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी यासंबंधी माहिती दिली आहे. जयंत खोब्रागडे यांची ही नियुक्ती भारत आणि पोलंडमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
खोब्रागडे यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले असून त्यांना परराष्ट्र धोरण आणि मुत्सद्देगिरी या क्षेत्रातील सखोल जाण आहे. त्यांची पोलंडमधील नियुक्ती दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये महत्त्वाचा टप्पा ठरू शकते. यापूर्वी, जयंत खोब्रागडे यांनी विविध राजनैतिक आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. परराष्ट्र सेवेतील आपल्या उत्कृष्ट योगदानासाठी ओळखले जातात.