जयंत बरेगार यांचा पोलीस ठाण्यात ठिय्या
मालवण:प्रतिनिधी
पोलीस ठाण्यातील दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास दिरंगाई होत असल्याने माहिती अधिकार कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी मालवण पोलीस ठाण्यात ठाण मांडले आहे. मालवण पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात बरेगार यांनी म्हटले आहे की ,सन २०१७ मध्ये मालवण हद्दीतील तपासकाम न केल्याने गुन्हा दाखल होईपर्यंत ठिय्या आंदोलन कायम ठेवणार असल्याचे बरेगार यांनी म्हटले आहे. १७ डिसेंबर २०२५ रोजी जलदगती टपालाने आपण पाठविला असून तो आपल्या कार्यालयाला 18 डिसेंबर रोजी पोहोचला आहे. यात आपण 2017 पासून माझ्या तक्रारीनुसार दाखल प्रथम गुन्हा 9/ 2027 नुसार मालवण पोलिस ठाणे हद्दीतील तक्रारीची चौकशी न झाल्याबाबत कळविले होते. तसेच याला जबाबदार असणाऱ्या चौकशी अधिकारी व पोलिस निरीक्षक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याला आज 15 दिवस झाले आहेत. मात्र, पोलीस ठाण्याकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे आपण पोलीस ठाण्यात दाखल झालो असून गुन्हा दाखल होईपर्यंत पोलीस ठाण्यात बसून राहणार आहे. त्यामुळे गुन्हा दाखल करून त्वरित एफआयआरची प्रत आपणास द्यावी असे बरेगार यांनी म्हटले आहे .