For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बीसीसीआयतर्फे जय शहा यांचा सत्कार होणार

06:43 AM Jan 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
बीसीसीआयतर्फे जय शहा यांचा सत्कार होणार
Advertisement

वृत्तसंस्था / मुंबई

Advertisement

आंतर राष्ट्रीय क्रिकेट मंडळाच्या (आयसीसी) अध्यक्षपदी निवड झालेले जय शहा यांचा रविवारी येथील भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाच्या (बीसीसीआय) कार्यालयात खास सत्कार करण्यात येणार आहे. जय शहा हे यापूर्वी बीसीसीआयचे सचिवपद भूषवित होते.

रविवारी बीसीसीआयची खास वार्षिक बैठक बोलविण्यात आली होती. पण ही बैठक रद्द करुन त्या ऐवजी विविध राज्यांच्या क्रिकेट मंडळाचे पदाधिकारी जय शहा यांच्या सत्कार समारंभाला रविवारी उपस्थित राहणार आहेत. गेल्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये जय शहा यांची आयसीसीच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली होती. 1 डिसेंबर रोजी जय शहा यांनी आयसीसी चेअरमनपदाची सुत्रे हाती घेतली. यापूर्वी ग्रेग बार्कले हे आयसीसीचे अध्यक्ष होते. पण त्यांनी तिसऱ्यांदा आयसीसीच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यास नकार दिला होता. 2019 च्या ऑक्टोबरपासून जय शहा यांनी बीसीसीआयचे सचिवपद सांभाळले होते. 2021 च्या जानेवारीमध्ये जय शहा यांची आशियाई क्रिकेट मंडळाच्या (एसीसी) चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली होती.

Advertisement

क्रिकेट या क्रीडा प्रकाराचा जागतिक स्तरावर झपाट्याने प्रसार करण्यात जय शहा यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. 2032 च्या ब्रिसबेन ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यासाठी या स्पर्धेच्या आयोजन समितीबरोबर जय शहा यांनी यापूर्वीच चर्चा केली.2028 साली होणाऱ्या लॉस एंजिल्स ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचे निश्चितपणे पुनरागमन होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. तब्बल 128 वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासाठी प्रक्रिया चालु आहे. जय शहा यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे चेअरमन मिकी बेअर्ड आणि इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाचे प्रमुख रिचर्ड थॉमसन यांच्याशी आयसीसी कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या नव्या प्रणालीबद्दल चर्चा केली आहे.

Advertisement
Tags :

.