For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘अजित सृष्टी’ पाहताना जय पवार भावूक; वडिलांच्या आवाजाने दाटून आले डोळे

01:34 PM Sep 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘अजित सृष्टी’ पाहताना जय पवार भावूक  वडिलांच्या आवाजाने दाटून आले डोळे
Advertisement

पुणे : गणेशोत्सवानिमित्त पुण्यातील आंबेगाव परिसरात उभारण्यात आलेल्या ‘अजित सृष्टी’ या देखाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनी भेट दिली. दिवंगत नेते अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देणारा हा देखावा पाहताना जय पवार भावूक झाल्याचे समोर आले आहे.

Advertisement

स्थानिक कार्यकर्ते युवराज बेलदरे यांच्या पुढाकारातून हा देखावा साकारण्यात आला आहे. अजित पवार यांच्या सार्वजनिक जीवनातील विविध टप्प्यांसोबत त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित जुन्या आठवणी आणि छायाचित्रेही येथे मांडण्यात आली आहेत. कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर जय पवार यांनी मंगळवारी, 22 सप्टेंबर रोजी या देखाव्याला भेट दिली.

जय पवार देखावा पाहत असताना पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या जुन्या भाषणातील आवाज ऐकू येत होता. कुटुंबीयांच्या आठवणींशी संबंधित संवाद सुरू होताच जय पवार काही क्षण स्तब्ध झाले. त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले आणि त्यांनी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी भावुक वातावरणात गणपती बाप्पाची आरती केली.

Advertisement

या प्रसंगाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर समोर आल्यानंतर त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. वडिलांच्या आठवणींनी जय पवार भावूक झाल्याचे दृश्य पाहून उपस्थित कार्यकर्ते आणि नागरिकही भावुक झाल्याचे वृत्त आहे.

गणेशोत्सवातील या देखाव्याच्या माध्यमातून अजित पवार यांच्या सार्वजनिक कार्याची आणि त्यांच्या आठवणींची मांडणी करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय विषयासोबतच कौटुंबिक आठवणींनाही या उपक्रमातून केंद्रस्थानी स्थान मिळाले आहे.

Advertisement
Tags :

.