पोलीस दलाच्या ऋणात राहून यापुढेही जनसेवेला प्राधान्य : निवृत्त पोलीस उपअधिक्षक जयकुमार सुर्यवंशी
वारणानगर प्रतिनिधी
पोलीस दलातील सेवेमुळे आणि सर्वांच्या सहकार्याने आपली कारकिर्द यशस्वी झाली त्यामुळे यापुढेही निवृत्ती नंतर देखील पोलीस दलाच्या ऋनात राहून यापुढेही जनसेवेला प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन शाहूवाडी उप विभागाचे पोलीस उपअधिक्षक जयकुमार सुर्यवंशी यानी केले.
पोलीस उपाधीक्षक जयकुमार सूर्यवंशी आज दि. ३१ रोजी सेवा निवृत्त झाल्या निमीत्त शाहुवाडी विभाग पोलीस दल, पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्यावतीने पोलीस उपअधिक्षक कार्यालय कोल्हापूर येथे निरोप समारंभ पार पडला. सन १९९१ मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलात नियुक्ती झाली सहाय्यक पोलीस निरीक्षक,पोलीस निरीक्षक ते पोलीस उपअधिक्षक पदापर्यन्त कर्तव्य निष्ठेने काम केले यामध्ये पन्हाळा, कोडोली पोलीस ठाणे तसेच उपअधिक्षक म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील कारकिर्द संस्मरणीय ठरली श्री महालक्ष्मी व श्री जोतिबा या तीर्थक्षेत्री सेवा करण्याचे भाग्य लाभल्याचे सुर्यवंशी यानी सांगून पोलीस कर्मचारी ते अधिकारी, राजकीय सामाजिक, शैक्षणित क्षेत्रातील व कुंटूंब आणि नातेवाईक यांच्या सहकार्याने यशस्वी सेवा बजावल्याचे सत्कारास उत्तर देताना सांगितले.
आर.आर.पाटील यांचाही सत्कार
पोलीस उपअधिक्षक आर.आर. पाटील यानी निवृत्तनंतर कायद्याची पदवी संपादन केलेबद्दल शाहूवाडी पोलीस दलाच्या वतीने पोलीस उपअधिक्षक जयकुमार सुर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी कोडोली पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक एस.ए. डोईजड,पोलीस उपनिरीक्षक नरेद्र पाटील, गगनबावडा पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक आवारे, कळे पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक रणजीत पाटील, पन्हाळा पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक माने राधानगरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सौ.पाटील, माजी समाज कल्याण सभापती विशांत महापुरे,पत्रकार दिलीप पाटील, सुनिल नवाळे यानी सत्कार प्रसंगी मनोगत व्यक्त केले. यावेळी जयकुमार सुर्यवंशी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.पोलीस उपअधिक्षक कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यानी समारंभाचे सूत्रसंचालन केले.