...यासाठी नेहरू जबाबदार नाहीत; इतकं विष का आहे ?- फारूख अब्दुल्ला
भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू कलम 370 साठी जबाबदार नसल्याचा खुलासा नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांनी केला आहे. हिवाळी अधिवेशन चालु असताना गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मिर मुद्द्या भारताचे माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांना जबाबदार धरल्यानंतर त्यांनी अशा प्रकारचा बचाव केला. तसेच सर्वोच्च न्यायालयाने 370 अनुच्छेदावरून देलेल्या निर्वाळ्यावरही नाराजी व्यक्त केली.
दिल्लीमध्ये माध्यमांशी संवाद साधताना नॅशनल कॉन्फर्रन्सचे अध्यक्ष फारूख आब्दुल्ला म्हणाले, "मला माहित नाही की या लोकांमध्ये नेहरूंविषयी इतकं विष का आहे ? काश्मिरच्या प्रश्नाला नेहरू जबाबदार नाहीत. जेव्हा कलम 370 काश्मिरमध्ये आमलात आणले तेव्हा सरदार पटेल तिथे होते."
पुढे बोलताना ते म्हणाले, "काश्मिर खोऱ्यावर मंत्रिमंडळाची बैठक झाली तेव्हा तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरू अमेरिकेत होते. निर्णय झाला तेव्हा श्यामा प्रसाद मुखर्जीही उपस्थित होते." असेही त्यांनी स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी एकमताने 2019 मधील संविधानातील कलम 370 रद्द करण्याचा सरकारचा निर्णय कायम ठेवला. 370 मुळे पूर्वीच्या जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा मिळाला होता. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मु आणि काश्मिरमध्ये 370 तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या चुकीच्या धोरणामुळे लादले गेले असा आरोप करून काँग्रेसवर टिका केली होती.