कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘मोहरे’मध्ये जावेद जाफरी

06:31 AM Dec 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गँगस्टर अन् पोलिसांमधील थरार पाहता येणार

Advertisement

मुंबईतील अंडरवर्ल्डच्या दुनियेवर आधारित एक सीरिज प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. गँगस्टर बॉस्को आणि पोलीस अधिकारी जब्बार यांच्यातील हा थरार प्रेक्षकांसाठी ओटीटीवर उपलब्ध आहे.

Advertisement

मोहरे नाव असलेल्या या सीरिजमध्ये जावेद जाफरीने गँगस्टर बॉस्कोची भूमिका साकारली आहे. याचबरोबर नीरज काबी, गायत्री भारद्वाज, आशिम गुलाटी, सुचित्रा पिल्लई, पुलकिन मकौल, शैलेश दातार, अमित सिंह असे अनेक कलाकार यात दिसून येणार आहेत. याचा ट्रेलर सादर करण्यात आला आहे.

‘मोहरे’चे दिग्दर्शन मुकुल अभ्यंकर यांनी केले आहे. चारुदत्त भागवत आणि आदित्य परुळेकर यांच्यासोबत मिळून त्यांनीच याची कहाणी लिहिली आहे. तर याचे संवाद हुसैन दलाल आणि अब्बास दलाल यांनी लिहिले आहेत. दीपक धर आणि  राजेश चड्ढा यांनी याची निर्मिती केली आहे. ही सीरिज अमेझॉन एमएक्स प्लेवर उपलब्ध आहे. प्रेक्षकांना ही सीरिज मोफत पाहता येणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article