Sangli News | जतमध्ये प्रचंड खळबळ! पोलिसांसमोरच पिस्तूल काढून दहशत माजवण्याचा प्रयत्न; माथाडी कामगारांकडून गाडीवर दगडफेक
जत : बाज (ता. जत) येथीलएका माथाडी ठेकेदाराकडे १० लाख रुपयांची खंडणी मागून जिवे मारण्याची धमकी दिली, याची तक्रार जत पोलिसात होताच संशयित निलेश गडदे व शंभरहून अधिक माथाडी कामगार यांच्यात पोलिस ठाण्यासमोरच जोरदार राडा झाला. संशयिताने पिस्तूल काढून दहशत निर्माण करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, माथाडी कामगारांनी त्याच्या गाडीवर दगडफेक केली.
दरम्यान, संशयित गडदे हा तेथून पसार झाला. उपस्थित कामगारांनी व पोलिसात जोरदार बाचाबाची झाली, जीव घेतल्यावर कारवाई करणार का?, असा संताप नागरिकांनी व्यक्त करत जत पोलिस ठाणे परिसरातमोठे दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
याबाबत जत पोलिस ठाण्यात लक्ष्मण पांडुरंग खरात (वय ४१, रा. बाज, ता. जत) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी निलेश विठोबा गडदे (रा. कुंभारी, ता. जत) व त्याच्या दोन अनोळखीसाथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०८ (४), ३३३. ३५१ (२), ३५२, ३(५) तसेच भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी व घटनास्थळी मिळालेली माहिती अशी की, दि. १० जून रोजी सायंकाळी सातच्यासाथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०८ (४), ३३३, ३५१(२), ३५२, ३(५) तसेच भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी व घटनास्थळी मिळालेली माहिती अशी की, दि. १० जून रोजी सायंकाळी सातच्यासुमारास संशयित आरोपी फिर्यादी यांच्या घरी गेला. त्यावेळी लक्ष्मण खरात घरी नसल्याने आरोपींनी त्यांच्या पत्नी रंजना खरात यांच्याशी संवाद साधला. आरोपी निलेश गडदे याने रेल्वे स्टेशनवरील मालधक्क्याचे काम सोडण्यास सांगितले. अन्यथा १० लाख रुपये देण्याची मागणी करतपैसे न दिल्यास लक्ष्मण खरात यांना ठार मारण्याची धमकी दिली.
यावेळी घरातील मुलांनाही तुम्हाला बाप हवा असेल तर माझ्या आडवे येऊ नका, अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपी तेथून निघून गेला. दरम्यान, आरोपी निलेश गडदे याने घरातून बाहेर पडल्यानंतर अहिल्यादेवी चौक परिसरात पिस्तूलातून हवेत गोळीबार ला. हा प्रकार घडताच दुसऱ्या दिवशी जत पोलिस ठाण्यासमोरच पिस्तूल काढून दहशत माजविण्याचा प्रयत्न झाला. यात संतप्त माथाडी कामगारांना त्याच्या गाडीवर दगदफेक केली. यामुळे जतेत मोठी खळबळ उडाली होती. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.