For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मातोंड - पेंडूर येथील श्री देव घोडेमुखाचा जत्रोत्सव १७ डिसेंबरला

11:46 AM Dec 14, 2023 IST | अनुजा कुडतरकर
मातोंड   पेंडूर येथील श्री देव घोडेमुखाचा जत्रोत्सव १७ डिसेंबरला
Advertisement

कोंब्याची जत्रा म्हणून प्रसिद्ध

Advertisement

न्हावेली / वार्ताहर
वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड पेंडूर गावचे देवस्थान श्री देव घोडेमुख देवाचा वार्षिक जत्रोत्सव रविवार १७ डिसेंबर रोजी संपन्न होत आहे. ३६० चाळ्यांचा अधिपती म्हणून श्रीदेव घोडेमुख देवस्थान प्रसिद्ध आहे. हा जत्रोत्सव कोंब्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे नवसाला पावणारा देव म्हणून श्री देव घोडेमुखाची ख्याती दुरवर पसरली आहे. आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी देवाला नवस बोलला जातो.व जत्रोत्सवावेळी फेडला जातो शेकडो वर्षाची परंपरा आजही भक्तीभावे सर्व भक्तगण श्रद्धेने पाळतात.दरवर्षी वाढता चाललेली भक्तगणांची गर्दी या देवाची महती सांगून जाते.या जत्रेसाठी सिंधुदुर्ग सोबत मुंबई पुणे कोल्हापूर रत्नागिरी तसेच राज्यांमधून भाविक दर्शनासाठी येतात.उंचावर असलेल्या श्री देव घोडेमुख दर्शन घेऊन मन प्रसन्न करतात देवस्थान कमिटी व योग्य करुन हा कार्यक्रम साजरा करतात .

Advertisement
Advertisement
Tags :

.