Vedant Bandgar Murder Case | चिमुकल्या वेदांत बंडगरचा निघृण खून; आमदार खोतांच्या संतापानंतर सांगली पोलीस दलात मोठे फेरबदल होणार?
सांगली : वेदांत बंडगर याच्याखूनप्रकरणी जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळेकर यांची चौकशी करण्यात आली आहे. त्याचा अहवाल कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरिक्षक यांच्याकडे पाठवला आहे. त्यावर आता महानिरिक्षकच निर्णय घेणार असल्याची माहिती अधीक्षक तुषार दोशी यांनी पत्रकारांशी गडदेच्या टोळीला मोक्का लावण्यात येणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे.
निरीक्षक संदीप कोळेकर यांनी परिस्थिती व्यवस्थित हाताळली नाही. त्यामुळेच तर चिमुकल्या वेदांत बंडगर यांचा निघृणपणे खून करण्यात आला आहे. हा खून कोळेकर याच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याचा आरोप आमदार सदाभाऊ खोत यांनी केला होता. त्यानंतर कोळेकर यांची पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडून खातेनिहाय चौकशी केली व अहवाल महानिरिक्षकांकडे पाठविला आहे. याची माहिती घेत ]
महानिरिक्षक संदीप कोळेकर यांच्याचौकशी करून ते निर्णय घेतील असे दोशी यांनी सांगितले. जिल्हयातील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्याचे रेकॉर्ड पुन्हा अद्यावत करा सध्या त्यांचे काय सुरू आहे. याची माहितीही घ्यावी असे आदेश सर्व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्याची माहिती अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली.
गुंड निलेश गडदे याच्या टोळीला मोक्का लावला जाणार
वेदांत बंडगर याच्या खून प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि त्याचे साथीदार यांच्याविरोधात यापुर्वी खुनाचे आरोप आहेत. तसेच गंभीर गुन्ह्याच्या नोंदी आहेत. याशिवाय खंडणी मागणे, धमकाविणे, मारामाऱ्या, खून तसेच बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगणे यासर्व गोष्टी एकत्रित केल्या असल्यामुळे निलेश गडदे आणि त्याच्या टोळीतील सदस्यांना मोक्का लावण्यात येणार आहे. त्यानुसार आमची कागदपत्रे तयार करण्यात येत असल्याचेही पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले.