For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News : डफळापुरात गांजा लागवड : दीड लाखांचा मुद्देमाल जप्त, एक ताब्यात 

12:17 PM Jun 06, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
sangli news   डफळापुरात गांजा लागवड   दीड लाखांचा मुद्देमाल जप्त  एक ताब्यात 
Advertisement
                                                  सात किलो ८९७ ग्रॅम गांजा हस्तगत
Advertisement

जत : डफळापूर (ता. जत) येथे घराच्या भिंतीच्या आडोशाला अवैधरित्या गांजाची लागवड केलेल्या ठिकाणी छापा टाकून ७ किलो ८९७ग्रॅम गांजा हस्तगत केला आहे. या गांजाची किंमत १ लाख ५७ हजार ९४० रुपयांचा होत असून याप्रकरणी बन्सीलाल श्रीपती वाघमारे (वय ६१) यांच्यावर गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनो व्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमननुसार गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास केली आहे पोलिसांनी संशियत आरोपी वाघमारे यास अटक केली आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल नाथा खोत यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, डफळापूर येथील बन्सीलाल श्रीपती वाघमारे (वय ६१) यांनी त्यांच्या राहत्या घरालगत भिंतीच्या आडोशाला विनापरवाना गांजाची लागवड केली आहे. या माहितीची खातरजमा झाल्यानंतर पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तातडीने छापा टाकला. 
छाप्यामध्ये घराशेजारी गांजाची झाडे लावून त्यांची जोपासना केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी गांजाची हिरवी, ओलसर पाने व फुले असलेली ४ ते ५ फूट उंचीची झाडे जप्त केली. झाडांचे तुकडे करून दोन पोत्यांत भरल्यानंतर त्यांचे वजन केले असता एकूण ७ किलो ८९७ ग्रॅम गांजा आढळून आला. त्याची अंदाजे किंमत १ लाख ५७ हजार ९४० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.  
Advertisement
Tags :

.