For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Jat Municipal Council | करनिर्धारण अधिकारी की लाचखोर शिकारी? निवडणुकीच्या शूटिंग बिलासाठी ७५ हजारांची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्याची इनसाईड स्टोरी!

03:15 PM Jun 11, 2026 IST | NEETA POTDAR
jat municipal council   करनिर्धारण अधिकारी की लाचखोर शिकारी  निवडणुकीच्या शूटिंग बिलासाठी ७५ हजारांची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्याची इनसाईड स्टोरी
Advertisement

Advertisement

जत: फोटो आणि व्हिडिओशूटिंगचे बिल मंजूर करण्यासाठी ५० हजार रुपयाची लाच घेताना - जत नगरपरिषदेचे करनिर्धारण प्रशासकीय अधिकारी प्रवीण रंगराव बाबर (वय ३१, सध्या रा. जत, मूळ रा. कामेरी, ता. वाळवा) याला - बुधवारी रंगेहात पकडले. ही कारवाई सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपाधीक्षक यास्मिन - इनामदार यांच्या पथकाने केली.

तक्रारदार यांचा फोटोग्राफीचा व्यवसाय असून २०२५ मधील जत नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या -प्रक्रियेसाठी फोटो आणि व्हिडीओ शुटींगचे कामाचे टेंडर त्यांना मिळालेले होते. सदर कामाचे बिल जत नगर परिषदेचे कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी प्रविण बाबर याने मंजुर करुन घेवुन पुढे लेखा शाखेकडे पाठविलेले होते. तेथुन तक्रारदार यांना ३ लाख ४१ हजार ९२२ रुपयांचा चेक अदा करण्यात आला होता. सदर अदा करुन दिलेल्या बिलाचा मोबदला मिळण्याकरीता संशयित प्रविण बाबरने तक्रारदाराकडे ७५ हजार रूपये लाचेची मागणी केली होती. याबाबतचा तक्रारी अर्ज तक्रारदारयांनी दि. १० जून रोजी सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिला होता. तक्रारदार यांच्या तक्रारीनुसार पडताळणी केली असता लोकसेवक प्रविण बाबर (कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी जत नगरपरीषद) याने तक्रारदाराकडे ७५ हजाराची मागणी करुन तडजोडीअंती ५० हजार लाच लागलीच स्वीकारण्याची संमती दर्शविली.

Advertisement

त्यानंतर त्वरित सापळा कारवाई करून प्रविण बाबर याला जत नगरपरीषदेखालील असलेल्या यशोदा फोटो स्टुडीओमध्ये तक्रारदाराकडून ५० हजार रूपये लाच स्विकारली असता रंगेहात पकडले आहे. त्याच्याविरुद्ध जत पोलीसात येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपाधीक्षक श्रीमती यास्मीन इनामदार, पोलीस निरीक्षक, योगेश चव्हाण, पोलीस अंमलदार प्रितम चौगुले, सागर नायकुडे, अजित पाटील, पोपट पाटील, उमेश जाधव, ऋषिकेश बडणीकर, मनोज निळकंठ, रामहरी वाघमोडे, धनंजय खाडे, सुदर्शन पाटील, चंद्रकांत जाधव, यांच्या पथकाने यशस्वी केली.

Advertisement
Tags :

.