For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Jat Crime News: घरफोडून सव्वा लाखाचा ऐवज लंपास

01:05 PM Jun 04, 2026 IST | NEETA POTDAR
jat crime news  घरफोडून सव्वा लाखाचा ऐवज लंपास
Advertisement
देवघरातील १२ तोळ्यांची चांदीची लक्ष्मीची मूर्तीही चोरट्यांनी पळवली
जत : जत शहरातील शंकर कॉलनी परिसरातील निळकंठ स्वामी यांचे घर फोडून सुमारे १ लाख २५ हजाराचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना मंगळवारी रात्री सव्वातीनच्या दरम्यान घडली. निळकंठ स्वामी हे निवृत्त शिक्षक आपल्या कुटुंबासह शंकर कॉलनीत राहतात. मंगळवारी सकाळी पत्नीला दवाखान्यात दाखविण्यासाठी कुलूप लावून सांगलीला गेले होते.
पत्नीला दाखविल्यानंतर स्वतः रुटीन तपासणी करताना त्यांना ब्लॉकेज असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ते सेवासदनमध्ये उपचारासाठी दाखल झाले. रात्री घरी कोणी नसल्याचे पाहून चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला.
बेडरूम मधील त्यातील २५ हजाराची रोकड आणि ५ तोळ्यांचे चांदीचे दागिने पळविले. देवघरातील १२ तोळ्यांची चांदीची लक्ष्मीची मूर्ती लंपास केली. बुधवारी सकाळी शेजाऱ्यांनी दार उघडल्याचे दिसताच चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यांनी माहिती स्वामींना दिल्यानंतर सायंकाळी मुलगा प्रज्वल स्वामी यांनी याने जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
Advertisement
Advertisement
Tags :

.

© Copyright, All Rights Reserved.