For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Jat Accident News: बसर्गीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू

12:02 PM Jun 13, 2026 IST | NEETA POTDAR
jat accident news  बसर्गीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू
Advertisement

अपघातानंतर वाहन चालक मदत न करता पळाला

Advertisement

जत : जत तालुक्यातील बसर्गी ते सिंदूर मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशांत राजकुमार शिंदे (वय २६, रा. बसर्गी, ता. जत) हे त्यांच्या हिरो होंडा सीडी डिलक्स (क्र. केए-४८-क्यू-०९५३) दुचाकीवरून जात असताना ११ जून रोजी रात्री ११.३० ते १२ जून रोजी पहाटे ३ वाजण्याच्या दरम्यान सिंदूर-बसर्गी रस्त्यावर बसगोंडा सगोंडा खंदाळ यांच्या घराजवळ अज्ञात वाहनाने समोरून जोरदार धडक दिली.

Advertisement

या अपघातात प्रशांत शिंदे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर संबंधित वाहन चालकाने मदत न करता घटनास्थळावरून पलायन केले आहे. या अपघातात दुचाकीचेही मोठे नुकसान झाले असून जखमी प्रशांत शिंदे याचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्यांचे वडील राजकुमार दशरथ शिंदे (वय ५२, व्यवसाय मजुरी, रा. बसर्गी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Tags :

.