For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जसीर बिलाल वाणीला 7 दिवस एनआयए कोठडी

06:49 AM Dec 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
जसीर बिलाल वाणीला 7 दिवस एनआयए कोठडी
Advertisement

दिल्ली स्फोटातील संशयित आरोपी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी जसीर बिलाल वाणी उर्फ दानिशला आणखी सात दिवसांची एनआयए कोठडी देण्यात आली आहे. बुधवारी बिलालला पटियाला हाऊस न्यायालयातील विशेष एनआयए खंडपीठासमोर हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने त्याची कोठडीची मुदत वाढविली. यापूर्वी 27 नोव्हेंबर रोजी त्याला सात दिवसांची कोठडी देण्यात आली होती. बिलालवर दहशतवादी उमरला आश्रय दिल्याचा आरोप आहे.

Advertisement

जम्मू काश्मीरमधील अनंतनागमधील काझीगुंड येथील रहिवासी असलेल्या वाणीला एनआयएने 17 नोव्हेंबर रोजी श्रीनगरमध्ये अटक केली होती. 10 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटापूर्वी ड्रोनमध्ये बदल करून आणि रॉकेट बनवून हल्ल्याच्या प्रयत्नात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना तांत्रिक मदत केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या स्फोटात 13 लोकांचा मृत्यू झाला होता. आतापर्यंत एनआयएने या प्रकरणात सात जणांना अटक केली आहे. यातील सर्व संशयित जम्मू काश्मीर पोलिसांनी पर्दाफाश केलेल्या व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित आहेत.

Advertisement
Tags :

.