महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

जरांगे पाटलांची तब्येत खालावली; उपचारासाठी दवाखान्यात दाखल

02:02 PM Dec 24, 2023 IST | Kalyani Amanagi
Advertisement

शनिवारी बीडमधील सभा आटोपल्यांनंतर मनोज जरांगे पाटील त्यांच्या गावी अंतरवली येथे आले होते. दरम्यान त्यांचे क्रिकेट खेळतांनाचे फोटो देखील व्हायरल झाले होते. यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना संभाजीनगर येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांना तपासले असून त्यांना अशक्तपणा आल्याचे त्यांना सांगण्यात आले आहे. त्यांना विश्रांतीची गरज असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. जरांगे पाटील यांना सर्दी, खोकला आणि डोके दुखी जाणवत आहे.

Advertisement

मराठा आरक्षणासाठी मजोज जरांगे पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबरचा अल्टीमेटम दिला होता. ही मुदत आज संपत आहे. असे असले तरी सरकारने यावर कोणतेही ठोस आश्वासन अथवा पावले उचलली नाहीत. यामुळे आंदोलनावर ठाम असल्याचा निर्धार जरांगे पाटील यांनी शनिवारी बीड येथे झालेल्या सभेत केला होता. जरांगे पाटील हे वीस जानेवारीपासून मुंबईमध्ये उपोषण करणार आहे.

Advertisement

 

Advertisement
Tags :
@maratha_researvation#manojjarangeadmitedhealth problemdeterioratedhospitaljarangepatiltreatment
Next Article