जपानची अर्थव्यवस्था घसरणीसह चौथ्या स्थानी
जर्मनीची झेप तिसऱ्या नंबरवर : कमकुवत चलन-घटत्या लोकसंख्येचा परिणाम : अमेरिकेची अर्थव्यवस्था जगात अव्वल
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
सलग दोन तिमाही संकुचित झाल्यानंतर जपानची अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेत जाण्याचे संकेत निर्माण झाले आहेत. यामुळे जपानची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर घसरली आहे. क्रमवारी पाहता जपानची जागा आता जर्मनीने जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होत घेतली आहे. जपान सध्या कमकुवत चलन, वाढते वय आणि घटती लोकसंख्या अशा समस्यांशी मोठ्या प्रमाणात झुंजत आहे. यापूर्वी 2010 मध्ये चीनच्या अर्थव्यवस्थेच्या मजबुत वाढीमुळे जपान दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर गेला होता. आजघडीला इतर सर्व देशात पाहता अमेरिकेची अर्थव्यवस्था ही जगात पहिल्या क्रमांकावर आघाडीवर राहिली आहे. अर्थव्यवस्थेत अमेरिकेचा कोणी हात धरु शकणार नाही, हे या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. दुसऱ्या स्थानी चीन हा देश राहिला आहे. जर्मनी तिसऱ्या क्रमांकावर तर भारत पाचव्या क्रमांकावर राहिला आहे. जपानची अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा 0.4 टक्के जास्त कमी झाली. जपानच्या कॅबिनेट कार्यालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशाचा जीडीपी एक वर्षापूर्वीच्या तुलनेत 2023 च्या शेवटच्या तीन महिन्यांत अपेक्षेपेक्षा 0.4 टक्के कमी झाला आहे. मागील तिमाहीत अर्थव्यवस्था 3.3 टक्केने कमी झाली होती. दोन तिमाहीत अर्थव्यवस्था संकुचित होणे म्हणजे मंदी कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था सलग दोन तिमाहीत संकुचित झाली, तर ती तांत्रिकदृष्ट्या मंदी मानली जात आहे.
ऑक्टोबरमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे भाकीत
ऑक्टोबरमध्ये, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भाकीत केले होते की जर्मनी जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकते. जपानची अर्थव्यवस्था सुमारे 4.2 ट्रिलियन डॉलर आहे. अर्थशास्त्रज्ञ नील न्यूमन यांच्या मते, नवीन आकडेवारी दर्शवते की 2023 मध्ये जपानची अर्थव्यवस्था सुमारे 4.2 ट्रिलियन अब्ज असेल, तर जर्मनीची अर्थव्यवस्था 4.5 ट्रिलियन अब्ज राहणार असल्याचे संकेत दिले होते.
जगातील पहिल्या दहा देशांची आर्थिक स्थिती (बिलियन डॉलरमध्ये)
- देश रँक जीडीपी
- अमेरिका 1 27,974
- चीन 2 18,566
- जर्मनी 3 4,730
- जपान 4 4,291
- भारत 5 4,112
- युनायटेड किंग्डम 6 3,592
- फ्रान्स 7 3,182
- इटली 8 2,280
- ब्राझील 9 2,272
- कॅनडा 10 2,242
स्रोत : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी