For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जपानी आयटी कंपनी भारतात 6000 जणांना देणार रोजगार

06:51 AM Feb 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
जपानी आयटी कंपनी भारतात 6000 जणांना देणार रोजगार
Advertisement

एनटीटी डेटा कंपनी : भारतामधील आपले स्थान मजबूत करण्यावरही देणार भर

Advertisement

नवी दिल्ली

जपानमधील दूरसंचार प्रमुख एनटीटी समूह 30 अब्ज डॉलरची आयटी सेवा, आपल्या वाढीव योजनांना चालना देणार आहे. वर्षाच्या अखेरीस भारतात आगामी काळात जवळपास 6,000 लोकांना रोजगार देण्याची योजना आखत आहे. हे अंदाजे 40,000 लोकांच्या सध्याच्या कौशल्यावर आधारीत आहे. यामध्ये 10 ते  15 टक्क्यांची वाढ होणार असल्याची माहिती आहे.

Advertisement

जागतिक स्तरावर कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे 1,90,000 आहे.भारत देशात यांचा कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याची सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ आहे. गेल्या वर्षी, कंपनीने सांगितले होते की, डेटा सेंटरच्या वाढत्या व्यवसायाचा फायदा घेण्यासाठी पुढील पाच वर्षांत भारतात सुमारे 3 अब्ज डॉलरची गुंतवणूक करेल.

गजेंद्र मेनन, वरिष्ठ संचालक (मानव संसाधन), एनटीटी डेटामधील ग्लोबल टॅलेंट ऍक्विझिशन, म्हणाले, ‘एनटीटी डेटामध्ये सर्व सेवांमध्ये कौशल्य असलेल्या लोकांना नियुक्त करतो.’ सध्याची मागणी जनरेटिव्ह एआय, सुरक्षा आणि गोपनीयतेवर केंद्रित आहे. याशिवाय आम्ही ऑटोमेशन, डेटा आणि अॅनालिटिक्स किंवा डेटा इंटिग्रेशनकडेही पाहत आहोत. तेव्हा या विषयांच्या तज्ञांची नेमणूक पुढील काळात करण्याचा मनोदय मेनन यांनी बोलून दाखवला.

आर्थिक वर्ष 27 च्या अखेरीस जागतिक स्तरावर 15,000 सायबर सुरक्षा व्यावसायिक जोडण्याची योजना आखली आहे. गेल्या वर्षी कंपनीने जागतिक स्तरावर एकात्मिक सायबर सुरक्षा धोरण सुरू केले. मेनन म्हणाले, ‘आमचे नवीन सायबर सुरक्षा धोरण ग्राहकांना आजच्या गुंतागुंतीच्या धोक्यांपासून सर्वसमावेशक संरक्षण देण्यासाठीही उपयुक्त ठरणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.’

Advertisement
Tags :

.