For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तैवाननजीक क्षेपणास्त्रs तैनात करणार जपान

06:20 AM Feb 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
तैवाननजीक क्षेपणास्त्रs तैनात करणार जपान
Advertisement

चीनच्या धमकीला चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी

Advertisement

वृत्तसंस्था/ टोकियो

चीनकडून सातत्याने मिळणाऱ्या धमक्यांदरम्यान जपानने मोठा निर्णय जाहीर केला आहे. जपान स्वत:च्या योनागुनी बेटावर जमिनीवरू आकाशात मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांना तैनात करणार आहे. हे बेट तैवानच्या सीमेपासून केवळ 110 किलोमीटर अंतरावर आहे. जपानचे संरक्षणमंत्री शिनजिरो कोइजूमी यांनी मार्च 2031 पर्यंत ही क्षेपणास्त्रs तैनात केली जाणार असल्याची घोषणा केली आहे.

Advertisement

अशाप्रकारची क्षेपणास्त्रs तैवाननजीक तैनात करण्याची घोषणा जपानने पहिल्यांदाच केली आहे. जपानच्या या पावलामुळे चीन आता आणखी भडकण्याची शक्यता आहे. यापूर्वी चीनने जपान पंतप्रधानांच्या एका वक्तव्यानंतर विरोधात अनेक पावले उचलली होती. तर दुसरीकडे जपानच्या संरक्षणमंत्र्यांनी या क्षेपणास्त्रांची तैनात योनागुनी बेटावर आवश्यक सुविधांच्या निर्मितीवर निर्भर असेल असे स्पष्ट केले आहे.

2030 च्या आर्थिक वर्षापर्यंत क्षेपणास्त्रs तैनात करण्याची योजना आखत आहोत. या क्षेपणास्त्र केंद्राला बेटाच्या पूर्व भागात निर्माण केले जाणार असल्याचे कोइजूमी यांनी सांगितले. याच बेटावर जपानच्या सैन्याचा तळ आहे. तैवान हा आमचा अविभाज्य भाग असून तो पुन्हा देशाशी जोडला जाणार असल्याचा चीनचा दावा आहे. जपानचे योनागुनी बेट तैवानच्या किनाऱ्यावरून दिसून येते.

जपान आणि चीन यांच्यातील तणाव नोव्हेंबर महिन्यापासून शिगेला पोहोचत असल्याचे चित्र आहे. तैवानवर चीनने हल्ला केल्यास जपान स्वत:चे सैन्य सक्रीय करणार असल्याचे वक्तव्य त्यावेळी पंतप्रधान सनाई ताकाइची यांनी केले होते.

चीनची जपानला धमकी

तैवानवर चीनकडून हल्ला झाल्यास जपान हस्तक्षेप करणार असल्याची चर्चा या वक्तव्यामुळे सुरू झाली होती. जपान हा अमेरिकेच्या आघाडीचा सदस्य असल्याने संभाव्य संघर्षात अमेरिकेलाही उडी घ्यावी लागण्याची शक्यता आहे. जपानच्या पंतप्रधानांच्या वक्तव्यानंतर चीनसोबतचे संबंध अत्यंत बिघडले आहे. चीन अनेक प्रकारे जपानवर दबाव निर्माण करत आहे. जपानच्या सागरी क्षेत्रात युद्धनौका पाठविणे, दुर्मिळ खनिजांची निर्यात रोखणे, चिनी पर्यटकांना जपानला जाण्यापासून रोखण्याचे पाऊल सामील आहे. तसेच चीनने जपानच्या 20 कंपन्यांवर निर्यातबंदी घातली आहे.

Advertisement
Tags :

.