For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

मंगळाच्या चंद्रावरून नमुने आणणार जपान

06:22 AM Oct 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
मंगळाच्या चंद्रावरून नमुने आणणार जपान
Advertisement

20 ऑक्टोबर रोजी अंतराळयानाचे होणार प्रक्षेपण

Advertisement

वृत्तसंस्था, टोकियो

जपानची अंतराळसंस्था जाक्सा मंगळाचा चंद्र फोबोसवरू नमुने आणणाऱ्या जगाच्या पहिल्या मिशनसाठी सज्ज आहे. मार्शियन मून्स एक्सप्लोरेशन (एमएमएक्स) नावाचे रोबोटिक अंतराळयान 20 ऑक्टोबर रोजी पहाटे 4.41 वाजता जपानी प्रमाणवेळेनुसार तानेगाशिमा अंतराळ केंद्रावरून एच3 रॉकेटद्वारे प्रक्षेपित होणार आहे.

Advertisement

या मिशनकरता रविवारी प्रक्षेपणपूर्व ब्रीफिंग पार पडले. हे मिशन फोबोसवरून कमीतकमी 10 ग्रॅम सामग्री जमविणार आहे. मंगळाच्या दोन्ही चंद्रांचे अध्ययन या माध्यमातून केले जाणार आहे. 2031मध्ये नमुन्यांना घेऊन अंतराळयान पृथ्वीवर परतणार आहे. फोबोस आणि डीमोस मंगळाचे दोन छोटे चंद्र आहेत. हे चंद्र कशाप्रकारे निर्माण झाले यावरून वैज्ञानिक दीर्घकाळापासून चर्चा करत आहेत.

या लघूग्रहांना मंगळाच्या गुरुत्वाकर्षणाने पडकल्याचा एक सिद्धांत आहे. तर एखाद्या मोठ्या टक्करमुळे मंगळ ग्रहावरून निघालेला ढिगारा जमा होत चंद्र निर्माण झाल्याचीही थेअरी आहे. एमएमएक्स मिशन या संबंधीच्या प्रश्नांची उत्तरे शोधणार आहे. फोबोसच्या मातीत पाणी आणि कार्बनिक पदार्थांचे संकेत मिळू शकतात, जे सौर मंडळात जीवनाच्या उत्पत्तीला समजून घेण्यास सहाय्यभूत ठरतील.

मिशन केवळ नमुने आणण्यापुरती मर्यादित नाही. हे फोबोसच्या पृष्ठभागाचा नकाशा तयार करेल, त्याच्या संरचनेचे अध्ययन करेल आणि डीमोसलाही फ्लायबाय करणार आहे. यामुळे मंगळ प्रणालीच्या विकासाचे अधिक स्पष्ट चित्र समोर येणार आहे. जाक्सानुसार हे नमुने भविष्यात मंगळावर मानवी मिशनसाठी उपयुक्त ठरतील, कारण फोबोसला संभाव्य बेस स्टेशनच्या स्वरुपात पाहिले जाऊ शकते.

Advertisement
Tags :

.