महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

26 जानेवारी जवळ आली, पालकमंत्री कोण? कोंडी फुटेना

12:14 PM Jan 16, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ शपथविधीनंतर खाते वाटप देखील झाले. आता जिह्याचे पालकमंत्री कोण होणार? याकडे जिह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. यापूर्वी हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांनी जिह्याचे पालकमंत्री म्हणून कामकाज पाहिले आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांकडून पालकमंत्री पदासाठी पुन्हा प्रयत्न सुरु आहेत. तर जिह्यातील आमदारांच्या संख्याबळावर पालकमंत्री पद देण्याचा निर्णय झाल्यास प्रकाश आबिटकर प्रबळ दावेदार ठरू शकतात. त्यामुळे पालकमंत्री पद देण्यासाठी राजकीय ज्येष्ठत्वाचा आधार घेतला जाणार की आमदारांच्या संख्याबळावर जिह्याचे पालकत्व दिले जाणार ? हे 26 जानेवारीपूर्वी समजणार आहे.

Advertisement

मंत्री हसन मुश्रीफ यांनी अडीच वर्षे कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला आहे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी जिल्हा नियोजनच्या निधी वाटपात समतोल साधण्याचा प्रयत्न केला. महायुती म्हणून युतीच्या सर्व स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याचा प्रयत्न केला. तसेच एक ज्येष्ठ, अभ्यासू नेते म्हणून मंत्री मुश्रीफ यांचा पालकमंत्री पद देण्यासाठी विचार झाल्यास त्यांना अन्य घटक पक्षांच्या नेत्यांकडून हिरवा कंदिल दिला जाऊ शकतो.

कोल्हापूर जिह्यात भाजपची ताकद आणखी वाढविण्यासाठी भाजपकडून मंत्री चंद्रकांत पाटील यांना पालकमंत्री पद दिले जाऊ शकते. जिह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकाराच्या राजकारणात भाजपचे सामर्थ्य वाढवून काँग्रेसला पुन्हा एकदा शह देण्यासाठी भाजपकडून चंद्रकांत पाटील यांच्याकडे पालकमंत्री पद दिले जाण्याची शक्यता आहे. चंद्रकांत पाटील यांचे महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या स्थानिक नेत्यांसोबत सलोख्याचे संबंध असल्यामुळे त्यांच्याकडे पालकमंत्री पद देण्यासाठी विरोध होण्याची शक्यता कमी आहे.

मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दहा वर्षात राधानगरी विधानसभा मतदारसंघाबरोबरच जिह्यातील अन्य प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले आहेत. कोणताही प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची त्यांची प्रतिमा आहे. त्यामुळेच जनतेने त्यांना हॅटट्रिकची संधी दिली. शिवसेनेचे जिह्यातील आमदारांचे संख्याबळ पाहता अन्य घटक पक्षांच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर आमदारांच्या संख्येवर पालकमंत्री पद देण्याचा निर्णय झाल्यास आबिटकर हे जिह्याचे पालक होतील.

 

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article