महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जिल्ह्यातील जनसुराज्यशक्तीच्या पाच उमेदवारांना सुमारे 3 लाख 97 हजार 959 मते

01:25 PM Dec 04, 2024 IST | Pooja Marathe
Jansurajya Shakti Candidates Secure 3.97 Lakh Votes"
Advertisement

महायुतीला लाभ तर मविआला फटका

Advertisement

कोल्हापूर

Advertisement

संस्कार, संकल्प, सिद्धी या त्रिसुत्रीने राज्यातील राजकारणात वेगळी ओळख निर्माण केलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाने विधानसभा निवडणुकीत उभ्या केलेल्या पाच उमेदवारांना जिल्ह्यात 3 लाख 97 हजार 959 मते मिळाली असून पक्षाच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे महायुतीला लाभ झाला आहे तर महाविकास आघाडीला याचा फटका बसला आहे.

महायुतीत भाजपचा घटकपक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाने कोल्हापूर जिह्यातील शाहूवाडी, हातकणंगले, चंदगड, करवीर या विधानसभेच्या चार जागा लढवल्या होत्या यामध्ये शाहूवाडीतून पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विद्यमान आमदार डॉ. विनय कोरे यांनी 1 लाख 36 हजार 64 मते मिळवून ठाकरे शिवसेनेचे उमेदवार सत्यजीत पाटील यांचा पराभव केला.

हातकणंगले मतदारसंघातून जनसुराज्यचे उमेदवार दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांना 1 लाख 34 हजार 191 मते मिळाली. त्यांना शिवसेना शिंदे गटाने पुरस्कृत केले होते. तर करवीरमधून संताजी घोरपडेंना 7931 मते मिळाली. त्यांना मिळालेल्या मताने शिवसेनेचे उमेदवार चंद्रदीप नरके यांचा विजय सोपा झाला, अशी चर्चा होऊ लागली आहे. त्यामुळे हातकणंगले आणि करवीरमधून शिवसेनेला जनसुराज्यचा लाभ शिंदें गटाला झाला आहे. चंदगडमधून जनसुराज्यच्या मानसिंग खोराटे यांनी 22 हजार 107 मते मिळवली आहेत.

वसमत मधून जनसुराज्यचे उमेदवार गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज यांनी 35 हजार 219 मते मिळवल्याने या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत उर्फ राजू भैय्या नवघरे यांचा विजय सुकर झाला तर जनसुराज्यने अहमदपूर मतदारसंघाचे उमेदवार गणेश हाके यांनी 62 हजार 447 मते मिळवत काटा लढत दिली. या ठिकाणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार बाबासाहेब पाटील यांचा विजय सुकर झाला.

जनसुराज्यचे देंगलूर येथील सहावे उमेदवार विरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने येथे भाजपाचे जितेश अंतापूरकर यांचा विजय सुकर झाला. भाजप महायुतीत जनसुराज्य शिवसेना (शिंदे गट) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सहभागी आहेत. महायुतीच्या जागा वाटपात दोन ठिकाणी शिवसेना (शिंदे गट) यांच्या करवीरमधील तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या वसमत व अहमदपूर येथील उमेदवारांचे विरोधात उमेदवार दिले होते. या मतदारसंघात जनसुराज्य च्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे अजित पवार यांचे उमेदवार विजय झाले आहेत तर देंगलूर मतदार संघातून पक्षाने माघार घेतल्याने भाजप उमेदवाराचा विजय झाला आहे. त्यामुळे जनसुराज्यने पाच उमेदवाराच्या माध्यमातून घेतलेल्या 397959 मतांमुळे महायुतीला लाभ झाला आहे.

स्थानिक राजकारणात बळ, जनसुराज्य शक्ती पक्षाची ताकद

राज्यातील काही जिह्यात तसेच शहरात, कोल्हापूर जिह्यात पक्षाचा सर्वच तालुक्यात कमी अधिक प्रमाणात प्रभाव आहे. विधानसभा निवडणूकीत पक्षाला मिळालेल्या 3लाख 97 हजार 959 मतांमुळे पक्षाचे बळ वाढले आहे यापुढे होऊ घातलेल्या महानगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत महायुतीला आपल्या सोबत निवडणूक लढवाव्यात असे बळ पक्षाने प्राप्त केले आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article