For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जान्हवीच्या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण

06:01 AM Apr 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
जान्हवीच्या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण
Advertisement

12 सप्टेंबरला होणार प्रदर्शित

Advertisement

शशांक खेतानच्या दिग्दर्शनात निर्माण झालेला चित्रपट ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’मध्ये वरुण धवन आणि जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट यंदाच्या बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निर्मात्यांनी जाहीर केली आहे. हा चित्रपट 12 सप्टेंबर रोजी प्रदर्शित केला जाणार आहे.

सनी संस्कारी की तुलसी कुमारी हा चित्रपट एक रोमँटिक ड्रामा असेल. शशांक खेतानच्या यापूर्वीच्या काही चित्रपटांमध्ये वरुण धवन आणि आलिया भट्ट ही जोडी दिसून आली होती. यामुळे नव्या चित्रपटातही आलियाची वर्णी लागेल अशी चर्चा सुरू होती. परंतु निर्मात्यांनी ही चर्चा फेटाळत जान्हवी मुख्य भूमिकेत असल्याची घोषणा केली होती.

Advertisement

निर्मात्यांनी या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण केले आहे. सध्या हा चित्रपट पोस्ट-प्रॉडक्शन स्थितीत आहे. या चित्रपटाची कहाणी शशांक खेताननेच लिहिली आहे. चित्रपटात वरुण आणि जान्हवीसोबत सान्या मल्होत्रा, रोहित सराफ, मनीष पॉल आणि अक्षय ओबेरॉय हे कलाकार देखील दिसून येणार आहेत.

वरुण धवन याचबरोबर ‘बॉर्डर 2’ या चित्रपटात सनी देओल आणि दिलजीत दोसांझसोबत काम करत आहे. तसेच तो स्वत:चे पिता डेव्हिड धवन यांच्या नव्या चित्रपटाचे चित्रिकरण लवकरच सुरू करणार आहे. तर जान्हवी ही ‘परम सुंदरी’ चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसून येणार आहे.

Advertisement
Tags :

.