For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ईशानच्या चित्रपटात जान्हवीचा कॅमियो

06:29 AM Oct 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
ईशानच्या चित्रपटात जान्हवीचा कॅमियो
Advertisement

जान्हवी कपूरने 2018 मध्ये ईशान खट्टरसोबत ‘धडक’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 6 वर्षांनी जान्हवी आणि ईशान पुन्हा एका चित्रपटासाठी एकत्र येणार आहेत. ईशान अन् जान्हवी हे दिग्दर्शक नीरज घायवान यांच्या आगामी चित्रपटासाठी एकत्र येणार आहेत. या चित्रपटात जान्हवी कपूरची कॅमियो भूमिका असेल, हा चित्रपट करण जौहरच्या धर्मा प्रॉडक्शन्सकडून निर्माण केला जात आहे.

Advertisement

जान्हवी कपूरने ईशानसोबत नीरज घायवानच्या चित्रपटात स्वत:च्या कॅमियो भूमिकेसाठी 10 दिवस राखून ठेवले आहेत. करण जौहरचा हा चित्रपट असल्याने जान्हवीला यासंबंधी नकार देता आला नाही. ईशान खट्टर हा जान्हवी कपूरचा एक्स बॉयफ्रेंड देखील आहे.

या चित्रपटात दोन नायक असणार आहेत. निर्मात्यांची आणखी एका अभिनेत्यासोबत चर्चा सुरू आहे. नीरजच्या या चित्रपटात दोन मित्रांची कहाणी दिसून येणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.

Advertisement

जान्हवी कपूर अलिकडेच ज्युनियर एनटीआरसोबत ‘देवरा : पार्ट 1’ या चित्रपटात दिसून आली आहे. या चित्रपटात सैफ अली खान आणि प्रकाश राज देखील मुख्य भूमिकेत आहेत. याचबरोबर जान्हवी कपूर ही सनी संस्कारी की तुलसी कुमारी या चित्रपटात काम करत आहे. अभिनेत्रीने वरुण धवन, रोहित सराफ आणि सान्या मल्होत्रासोबत याचे चित्रिकरण सुरू केले आहे. तर ईशान हा अलिकडेच द परफेक्ट कपल या सीरिजमध्ये दिसू आला आहे.

Advertisement
Tags :

.