दाक्षिणात्य चित्रपटात रामचरणसोबत जान्हवी
दिग्दर्शक बुची बाबू सना यांचा बहुप्रतीक्षित अॅक्शनपट ‘पे•ाr’मध्ये अभिनेत्री जान्हवी कपूर झळकणार आहे. हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट असून यात ती अचियम्मा नावाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत राम चरण मुख्य भूमिकेत आहे. जान्हवी आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत स्वत:चा जम बसवू पाहत असल्याचे मानले जात आहे.
या चित्रपटातील जान्हवीचा फर्स्ट लुक सादर करण्यात आला आहे. निर्मात्यांनी जान्हवीची दोन पोस्टर्स जारी केली असून ती पाहता तिची भूमिका अत्यंत उग्र आणि निडर असेल, असे कळते या चित्रपटाचे चित्रिकरण श्रीलंकेत पार पडणार आहे. हा चित्रपट 27 मार्च 2026 रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. पे•ाr चित्रपटाच्या युनिटने अलिकडेच 1000 डान्सर्ससोबत याच्या एका गाण्याचे चित्रिकरण पूर्ण केले आहे. रामचरणवर हे भव्य गीत चित्रित करण्यात आले असून याचे नृत्यदिग्दर्शन जानी मास्टरने केले आहे. राम चरणने या भूमिकेसाठी मोठी तयारी केली आहे. त्याने स्वत:च्या लुकला पूर्णपणे ट्रान्सफॉर्म केले आहे. जान्हवीने यापूर्वी एका तेलगू चित्रपटात ज्युनियर एनटीआरसोबत काम केले होते.