राम चरणसोबत झळकणार जान्हवी
स्पोर्ट्स ड्रामामध्ये मुख्य भूमिका
राम चरण हा दाक्षिणात्य अभिनेता अलिकडेच गेम चेंजर या चित्रपटात दिसून आला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी ठरला नाही. परंतु आता राम चरणने स्वत:चा आगामी चित्रपट आरसी16 वर लक्ष केंद्रीत पेले आहे. या चित्रपटाचे हे नाव तात्पुरते असून पुढील काळात नव्या नावाची घोषणा केली जाणार आहे.
बुची बाबू यांच्याकडून दिग्दर्शित हा स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट चालू वर्षातच प्रदर्शित होणार आहे. म्हैसूर आणि हैदराबादमध्ये चित्रिकरण पार पडणार आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर नायिकेच्या भूमिकेत आहे. याचबरोबर शिवा राजकुमार, जगपति बाबू आणि दिव्येंदु शर्मा देखील यात दिसून येणार आहे. तर या चित्रपटाला ए.आर. रहमान यांचे संगीत लाभणार आहे.
या चित्रपटाकडून राम चरण अन् जान्हवीला मोठ्या अपेक्षा आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने राम चरण अन् जान्हवी ही जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. जान्हवीचा हा दुसरा दाक्षिणात्य चित्रपट ठरणार आहे.