महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सिद्धार्थसोबत झळकणार जान्हवी

06:16 AM Nov 13, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दिनेश विजानच्या थ्रिलर चित्रपटात करणार काम

Advertisement

निर्माता दिनेश विजानने अलिकडेच 9 चित्रपटांची घोषणा केली असून विविध शैलींच्या कलाकारांसोबत काम करण्याची तयारी त्याने दर्शविली आहे. छोट्या शहरांच्या कहाण्यांना मिळणारे यश पाहता विजानने त्यावर अधिक भर दिला आहे. जियो स्टुडिओजसोबत मिळून त्याने कंटेंट निर्मितीला प्रोत्साहन दिले आहे. विजानने आता अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राला स्वत:च्या आगामी चित्रपटासाठी करारबद्ध केले आहे. हा एक थ्रिलरपट असून यात अभिनेत्री जान्हवी कपूर नायिकेच्या भूमिकेत असणार आहे.

Advertisement

चित्रपटातील काही अॅक्शन सीक्वेंसवरून सिद्धार्थ आणि निर्मात्यादरम्यान चर्चा झाली आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण पुढील वर्षी सुरू होणार आहे. या चित्रपटाद्वारे सिद्धार्थ आणि जान्हवी यांची जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.  जान्हवी आणि सिद्धार्थच्या या आगामी चित्रपटाच्या दिगदर्शकाचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. सिद्धार्थ लवकरच ‘योद्धा’ आणि ‘इंडियन पुलिस फोर्स’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर जान्हवी कपूर ही ‘उलझ’ आणि ज्युनियर एनटीआरसोबतच्या ‘देवरा’ या चित्रपटात काम करत आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article